मध्य प्रदेशात असंवेदनशीलतेचा कळस, पत्नीच्या मृतदेहासह बसमधून खाली उतरवले
By Admin | Updated: August 27, 2016 09:02 IST2016-08-27T08:01:49+5:302016-08-27T09:02:56+5:30
बसमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर असंवेदनशील चालकाने तिच्या पतीला मृतदेहासकट अर्ध्या रस्त्यात खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला.

मध्य प्रदेशात असंवेदनशीलतेचा कळस, पत्नीच्या मृतदेहासह बसमधून खाली उतरवले
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २७ - ओदिशामध्ये मृतदेहाची अवहेलना झाल्याची घटना अद्याप ताजी असतानाचा मध्य प्रदेशमध्येही असाच असंवेदनशील प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. बसमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर असंवेदनशील चालकाने तिच्या पतीला मृतदेहासकट अर्ध्या रस्त्यात खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घोघरा गावात ही घटना घडली आहे.
रामसिंग यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते तिला एका खासगी बसमधून उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र प्रवासातच तब्येच बिघडल्याने त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या ५ दिवसांपूर्वीच त्यांनी एका बाळाला जन्म दिला होता.
रामसिंह यांच्या पत्नीच्या मृत्यूनतंर त्यांना मदत करण्याऐवजी बसचालकाने त्यांना तत्काळ खाली उतरवल. भर पावसात रामसिंग पत्नीच्या मृतदेहासह पावसात भिजत होते. अखेर काही वेळानंतर त्याच मार्गावरून जाणा-या दोन वकिलांनी रामसिंग यांना मदत केली. त्यांनी १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांशी संपर्क साधत मदत मागितली. मात्र पोलिसांनीही असंवेदनशीलता दाखवत फक्त त्यांची चौकशी केली व ते निघून गेले. त्यानंतर वकिलांनीच अॅम्ब्युलन्सची सोय करुन महिलेचा मृतदेह घरापर्यंत पोहोचवला.
आणखी वाचा :