शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

इराणवरील हल्ल्याची पीएम मोदींना आधीच कल्पना होती? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:44 IST

Middle East Tensions: पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इस्त्रायल दौऱ्यावर होते.

Iran War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इस्त्रायल दौऱ्यानंतर इराणवर झालेल्या हल्ल्याबाबत भारताला पूर्वकल्पना होती का, या प्रश्नावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, इराणवरील हल्ल्याबाबत इस्त्रायलने भारताशी कोणतीही पूर्व चर्चा केली नव्हती आणि या कारवाईची माहिती भारत सरकारला आधीपासून नव्हती.

मोदींचा इस्त्रायल दौरा आणि करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इस्त्रायल दौरा केला होता. हा त्यांचा इस्त्रायलमधील दुसरा महत्त्वाचा दौरा होता. यापूर्वी जुलै 2017 मध्ये त्यांनी इस्त्रायलचा ऐतिहासिक दौरा केला होता, जो कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा पहिला अधिकृत इस्त्रायल दौरा होता. या दौऱ्यात भारत आणि इस्त्रायल यांच्यात AI, सायबर सुरक्षा, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये एकूण 16 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दौऱ्यानंतर इराणवर हल्ला

पंतप्रधान मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यानंतर काही दिवसांनी, 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर भारताला या हल्ल्याची पूर्व माहिती होती का, याबाबत राजकीय आणि राजनैतिक स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता सरकारने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

युद्ध लवकरच थांबणार?

इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणची अणु क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून, येत्या काही दिवसांत युद्ध संपण्याची शक्यता आहे. तसेच इराणकडून युद्धविरामाची मागणी करण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला होता. मात्र, इराणने ट्रम्प यांचे सर्व दावे फेटाळून लावले असून कोणत्याही दबावाखाली झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

नाटो देशांचा अमेरिकेला पाठिंबा नाही

या संघर्षात अमेरिकेला नाटो देशांचा अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचेही समोर आले आहे. युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि स्पेनसह अनेक देशांनी उघडपणे समर्थन देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त करत नाटोमधून बाहेर पडण्याचाही विचार करू शकतो, असे वक्तव्य केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India unaware of Iran attack, clarifies government after Modi's Israel visit.

Web Summary : India was not informed beforehand about the Iran attack following PM Modi's Israel visit, the government clarified. Israel did not discuss the action with India. No NATO support for US.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरNarendra Modiनरेंद्र मोदीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू