शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिहारमध्ये लवकरच मध्यावधी निवडणुका? महागठबंधन सरकार विधानसभा बरखास्तीची शिफारस करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 08:27 IST

Bihar Politis : बिहारमध्ये सत्ताबदलाबरोबरच राजकीय हालचाली अधिक वेगवान झाल्या आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेऊ इच्छित आहेत, तर भाजप हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.

- शरद गुप्तानवी दिल्ली : बिहारमध्ये सत्ताबदलाबरोबरच राजकीय हालचाली अधिक वेगवान झाल्या आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेऊ इच्छित आहेत, तर भाजप हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.दोन्ही पक्षांना वाटते की, मागासांना प्राधान्य देऊन निवडणुकांना सामोरे गेल्यावर भाजपवर चांगली मात करता येईल व स्थिर सरकार देता येईल; परंतु हा निर्णय घेण्याआधी ते सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची अधिसूचना जारी करू इच्छित आहेत. महागठबंधन सरकार स्थापन होताच १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याची घोषणा तेजस्वी यादव यांनी केली होती, तर नितीशकुमार यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील भाषणात २० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी २०१५ मध्ये या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या होत्या व काँग्रेससह १७८ जागा जिंकून ४८ टक्के मते मिळवली होती. तेव्हा भाजपला २४ टक्के मते घेऊन ५३ जागा जिंकता आल्या होत्या. भाजप नेते सातत्याने कायदा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. परंतु तेजस्वी यादव यांचे म्हणणे आहे की, मागील २० पैकी १७ वर्षांच्या कालावधीत जदयूचे सरकार भाजपबरोबर सत्तेत होते. त्यामुळे हा दावा पोकळ आहे.

भाजपची रणनीतीn विधानसभा बरखास्त होण्याची भीती दाखवून जदयू व राजदच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. n भाजपचे एक माजी केंद्रीय मंत्री व संघटन मंत्र्याने तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा तेजस्वी यादव यांची भेट घेऊन अनेक पर्यायांवर चर्चा केली. n तेजस्वी यादव हे काही काळासाठी अस्थिर सरकार चालविण्याऐवजी स्थिर सरकारसाठी बहुमत स्थापन करण्याच्या विचाराचे आहेत. 

नवीन समीकरणबिहारच्या विधानसभेत सदस्य : २४२ ७९ राजद ४३ जदयू १९ काॅंग्रेस १६ डावे भाजपकडे ७५ आमदार आहेत.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण