शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक : AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 08:25 IST

Coronavirus : देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद, महाराष्ट्रातही आढळले सर्वाधिक रुग्ण

ठळक मुद्देदेशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंदमहाराष्ट्रातही आढळले सर्वाधिक रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचं मत एम्सचे प्रमुख आणि कोविड टास्कफोर्सचे महत्त्वाचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं. देशात कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येला आळा घालणं आणि सुरक्षेच्या सूचनांचं पालन करण्यासाठी नव्या रणनितीची आवश्यकता आहे. जेणेकरून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवता येईल, असा सल्ला त्यांनी रविवारी दिला. "देशात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची शक्यता आहे. तसंच जोपर्यंत यावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर ताण कायम राहिल. यासाठी मायक्रो लॉकडाऊन हा एक पर्याय आहे, जो कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत करू शकतो. आपल्याला जलदगतीनं रोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी करावी लागेल. यामध्ये कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊन एरिया, चाचण्यांची संख्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन अशा पर्यायांचा वापर केला पाहिजे," असं गुलेरिया म्हणाले. 

अर्थव्यवस्थेला फटका न बसणारी पावलं उचलावी"आपण अशी पावलं उचलू शकतो ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार नाही. यामध्ये अनावश्यक प्रवासाला टाळलं पाहिजे. तसंच लोकांनी निश्चितच्या सुट्टीच्या कालावधीत बाहेर जाणं टाळलं पाहिजे. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर अंकुश लावण्यास मदत मिळेल. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला नाही अशा ठिकाणीही लक्ष देण्यास यामुळे मदत मिळेल," असं ते म्हणाले.हा एक मोठा बदल आहे, आम्ही केवळ हवाई प्रवासाबद्दलच बोलत नाही तर रस्ते आणि गाड्यांच्या हालचालींबद्दलही बोलत आहोत. परंतु जेव्हा आपण त्यास संपूर्णतेकडे पहाल तेव्हा आपल्याला हे समजेल की ते किती अवघड आहे. जीनोम सिक्वेंन्सिंग आणि त्याच्या महासाथीच्या डेटाच्या जोडणीसाठी हे महत्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयIndiaभारत