म्हाडा लॉटरी :

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:39+5:302015-08-11T22:11:39+5:30

म्हाडा लॉटरी :

MHADA Lottery: | म्हाडा लॉटरी :

म्हाडा लॉटरी :

हाडा लॉटरी :
विजेत्यांना ७ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करता येणार
मुंबई :
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध उत्पन्न गटांसाठी बांधलेल्या सदनिकांची लॉटरी मे महिन्यात काढण्यात आली. या सोडतीमधील विजेत्यांना ७ सप्टेंबरपर्यंत ॲक्सीस बँकेत कागदपत्रे सादर करता येणार आहेत.
म्हाडाच्या १ हजार ६३ घरांची लॉटरी ३१ मे रोजी काढण्यात आली. या लॉटरीतील विविध भागांतील घरांसाठी सुमारे सव्वा लाख मुंबईकरांनी नशीब अजमावले होते. लॉटरीतील विजेत्यांना ७ सप्टेंबरपर्यंत ॲक्सीस बँकेच्या १५ शाखांमध्ये कागदपत्रे जमा करता येणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील १0 आणि राज्यातील इतर शाखांमध्ये विजेत्यांना कागदपत्रे जमा करता येतील. कागदपत्रे सादर करण्यात येणार्‍या बँकांची यादी विजेत्यांना पाठविण्यात आलेल्या सुचनापत्रासोबत देण्यात आल्याचे, म्हाडाच्या अधिकार्‍याने सांगितले.

Web Title: MHADA Lottery:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.