मेट्रोरिजनचे गोलमाल- भाग २
By Admin | Updated: February 20, 2015 01:09 IST2015-02-20T01:09:54+5:302015-02-20T01:09:54+5:30

मेट्रोरिजनचे गोलमाल- भाग २
>डेव्हलपेंट ॲग्रीमेंटच्या भरवशावर ले-आऊटला मंजुरी मिळवून घेणारे डेव्हलपर्स भूखंड विकून मोकळे होतील. पण, खरेदी केलेले भूखंड नियमित होणार नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेले विकास शुल्क डेव्हलपर्स भरेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांना घर बांधण्यासाठी नासुप्रकडून अधिकृत परवानगी मिळणार नाही. भूखंड खरेदी करणाऱ्यांनाच मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे डेव्हलपर्सने विकास कामे केल्याशिवाय भूखंड खरेदी न करणे हा उत्तम पर्याय आहे. अज्ञानापोटी असा भूखंड खरेदी केला असेल तर किमान डेव्हलपर्सने विकास कामे करण्यापूर्वी त्याच्याकडे विकास शुल्क जमा करू नका. चौकट..या बाबी तपासा- डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कसे आहे- विकास शुल्क भरले आहे का- भूखंड रिलीज झाले आहेत का - किती दिवसात विकास कामे करणार