कोलकात्यात मेट्रो बोगद्यात अडकली

By Admin | Updated: June 23, 2014 15:21 IST2014-06-23T15:14:26+5:302014-06-23T15:21:37+5:30

कोलकाता येथे एक मेट्रो ट्रेन सुमारे दीड तास बोगद्यातच अडकून पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

In the metro tunnel in Kolkata stuck | कोलकात्यात मेट्रो बोगद्यात अडकली

कोलकात्यात मेट्रो बोगद्यात अडकली

ऑनलाइन टीम

कोलकाता, दि. २३ -  कोलकाता येथे एक मेट्रो ट्रेन सुमारे दीड तास बोगद्यातच अडकून पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. सोमवारी दुपारच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो बंद पडली व बोगद्यात अडकली. यावेळी मेट्रोमध्ये सुमारे २०० प्रवासी होते. मदतीसाठी याचना करूनही सुमारे दीड तास त्यांना तेथेच अडकून पडावे लागले. त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी तेथे पोचले व त्यांनी बचाव कार्य सुरू करत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मात्र इतका वेळ मेट्रोतच काढावा लागल्याने अनेक प्रवासी गुदमरले व त्यांना त्रास होऊलागला. त्यांना उपचारांसाठी ताडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. 

Web Title: In the metro tunnel in Kolkata stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.