लवकरच दिसणार नदीखालून धावणारी मेट्रो
By Admin | Updated: May 29, 2017 17:01 IST2017-05-29T17:01:56+5:302017-05-29T17:01:56+5:30
भारतात लवकरच नदीखालून धावणारी मेट्रो दिसणार असून विशेष म्हणजे देशातील अशा प्रकारचा हा पाहिलाच प्रोजेक्ट असणार आहे

लवकरच दिसणार नदीखालून धावणारी मेट्रो
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 29 - भारतात लवकरच नदीखालून धावणारी मेट्रो दिसणार आहे. विशेष म्हणजे देशातील अशा प्रकारचा हा पाहिलाच प्रोजेक्ट असणार आहे. कोलकातामध्ये ही मेट्रो धावताना दिसणार आहे. हुगली नदीखाली सुरु असलेल्या बोगद्याचं काम पुढील आठवड्यापर्यंत पुर्ण होईल. या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. याच मार्गावर नदीखालून धावणारी मेट्रो पाहायला मिळणार आहे.
हावडा आणि महाकरन मेट्रो स्टेशनचे प्रवासी एका मिनिटासाठी नदीखालून प्रवास करतील. या बोगद्यात मेट्रोचा वेग ताशी 80 किमी असेल. या मार्गावर मेट्रो 10.6 किमीचा प्रवास बोगद्यातून करणार असून, नदीखाली बांधण्यात आलेल्या बोगद्याची लांबी 520 मीटर इतकी आहे.
नदीच्या खाली तयार करण्यात आलेल्या या बोगद्यासाठी 60 कोटी खर्च करण्यात आले आहेत. तर पुर्व - पश्चिम मेट्रो प्रोजेक्टसाठी एकूण नऊ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्याचं काम गतवर्षी एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आलं होतं, आणि ते लवकरच पुर्ण होईल. पुर्व - पश्चिम मेट्रो 2019 पर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न आहे. अधिका-याने सांगितल्यानंतर तात्काळ सेवेसाठी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी पर्यायी मार्ग म्हणून मेट्रोचा वापर करता येऊ शकतो