मेट्रो रेल्वेला मिळाली जागा

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:46+5:302015-08-08T00:23:46+5:30

मेट्रो रेल्वेला मिळाली जागा

Metro rail gets space | मेट्रो रेल्वेला मिळाली जागा

मेट्रो रेल्वेला मिळाली जागा

ट्रो रेल्वेला मिळाली जागा
जिल्हा प्रशासनातर्फे जागा हस्तांतरित : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे

नागपूर :
मेट्रो रेल्वेच्या कामास गती येण्यासाठी हिंगणा रोडवरील एसआरपीएफची २६ हेक्टर जागा, टी पॉईंट येथील वॉर्डन रेसिडेन्सीची २५०० स्क्वेअर मीटर आणि यशवंत स्टेडियम जवळील १९ हजार ९०० स्क्वेअर मीटर जागा मेट्रो रेल्वेला गेल्या ४ ऑगस्ट रोजी आगाऊ हस्तांतरित करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
कस्तूरचंद पार्कसमोरील महराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा व सीताबर्डी येथील टेक्निकल हायस्कूलच्या जागेचा आगाऊ ताबा येत्या सोमवारी देण्यात येईल, एसआरपीएफला वायफळ येथील ६० हेक्टर जागा पर्यायी म्हणून देण्यात आली आहे. या जागेला स्थानिक एसआरपीएफनी पसंती कळविली असल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

Web Title: Metro rail gets space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.