मेट्रो-३चे कारडेपो कांजूरमार्गला? तज्ञ समितीचा शासनाकडे अहवाल सादर आरे कॉलनीतील वृश्रतोड टळणार
By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:35+5:302015-08-12T23:54:35+5:30
मेट्रो-३चे कारडेपो कांजूरमार्गला?

मेट्रो-३चे कारडेपो कांजूरमार्गला? तज्ञ समितीचा शासनाकडे अहवाल सादर आरे कॉलनीतील वृश्रतोड टळणार
म ट्रो-३चे कारडेपो कांजूरमार्गला?तज्ञ समितीचा शासनाकडे अहवाल सादरआरे कॉलनीतील वृश्रतोड टळणारजमीर काझी/मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो-३च्या नियोजित कार डेपोला होत असलेल्या विरोधापुढे राज्य शासन सपशेल माघार घेण्याच्या निर्णयाप्रत पोहचले आहे. याबाबत नेमलेल्या तज्ञांच्या समितीने आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील भूखंडावर कारडेपो बनविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे जोगेश्वरी-विक्रोळी आणि पूर्व महामार्गाच्या मध्यावर असलेल्या याठिकाणाहून कुलाबा-वांद्रे सिप्झ ही मेट्रो धावण्याची चिन्हे आहेत.समितीने बुधवारी नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच अंतिम निर्णय घेतील, असे विभागातील सूत्रांनी सांगितले. सुमारे ३३.५ किलो मीटर लांबीच्या पूर्णपणे भूमिगत मेट्रो-३चे कारडेपो गोरेगावातील आरे कॉलनीत निित करण्यात आले होते. मात्र त्याला पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात याबाबत तज्ञांची अभ्यास समिती नेमली होती.समितीच्या सूचनेनुसार ठिकाण कांजूरमार्ग येथे निित केल्यास मेट्रो-३ च्या नियोजित अंतरामध्ये सहा किलोमीटर अंतर वाढणार आहे. त्यासाठी आय.आय.टी पवईपर्यंत स्वतंत्र एक स्थानकही बनविले जाईल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च १ हजार ८०० कोटी रुपयांवरून २ हजार कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी जपानमधील जपान आंतरराष्ट्रीय को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीआय) या कंपनीने अर्थसहाय्य केले आहे. त्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.मुंबई मेट्रोच्या प्राथमिक नियोजनानुसार सिप्झ ते कांजूरमार्ग हा मेट्रोचा सहावा मार्ग करण्याबाबत शासन गांभिर्याने विचार करीत आहे. त्यामुळे त्याबाबतच्या विस्तारीत मार्गाची निविदा मागविण्याच्या प्रक्रियेला आणखी काही काळ लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे करार केले जातील, असेही एका अधिकार्याने स्पष्ट केले.अभ्यास समितीमध्ये एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, मुंबई महापालिकचे आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. राकेश कुमार, सेंटर फॉर सायन्स आय.आय.टी. पवईच्या संचालिका डॉ. रश्मी पाटील, रवि सिन्हा आणि दिल्ली मेट्रो कार्पोरेशनचे संचालक बलविंदर कुमार यांचा समावेश होता.............................आरे कॉलनीत नियोजित कारडेपोला पर्याय म्हणून बॅकबे रिक्लेमेशन, कांजूरमार्ग, वडाळा, बीकेसी, कलिना येथील मुंबई विद्यापीठाची जागा याबाबत विचार करण्यात आला. मात्र, बॅकबे रिक्लेमेशनजवळील जागेवर पूर्वीपासून आरक्षण असल्याने कांजूरमार्गची जागा समितीने निित केल्याचे सांगण्यात आले.............................मेट्रो-३च्या पहिल्या नियोजित रचेनेनुसार आरे कॉलनीत कार डेपो बनविण्यासाठी २ हजार २९८ झाडांचा अडसर होता. त्यामध्ये २५४ वृक्ष मुळापासून तोडावे लागणार होते. तर उर्वरित अन्य ठिकाणी रोवले जाणार होते..................