शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

#MeToo: अखेर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 4:58 PM

अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने अडचणीत सापडलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

नवी दिल्ली - अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने अडचणीत सापडलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तेव्हापासून अकबर यांच्यावर  आतापर्यंत 15 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एम. जे. अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र रमानी यांना 19 महिला पत्रकारांनी पाठिंबा दर्शव अकबर यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. 

मी टू चळवळीत महिलांनी केलेल्या आरोपांनंतर अकबर मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे म्हटले जात होते. काँग्रेस, माकपासह अनेकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पंतप्रधान मोदी अकबर यांचा दौऱ्यावरून परतताच राजीनामा घेतील, असेही बोलले जात होते. मात्र अकबर यांनी परदेश दौऱ्यातून माघारी परतल्यावर राजीनामा देण्याऐवजी संबंधित महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यासाठी त्यांनी 97 वकिलांची फौजही उभी केली होती. मात्र अखेर अकबर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

अकबर यांच्यावर 15 आतापर्यंत महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. दरम्यान, रमानी यांच्या समर्थनार्थ पुढ आलेल्या 19 महिलांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. रमानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात आपल्याला साक्ष देण्याची संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी यातून केली आहे. 'रमानी या संघर्षात एकटी नाही. न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात आमची साक्ष नोंदवावी. आमच्यातील काहीजणी लैंगिक अत्याचाराच्या साक्षीदार आहेत,' असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यावर सर्व 19 महिलांची स्वाक्षरी आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मीनल बघेल, मनीषा पांडे, तुषिता पटेल, कणिका गहलोत, सुपर्णा शर्मा, रमोला तलवार बादाम, होइहनु होजेल, आएशा खान, कुशलरानी गुलाब, कनीजा गजारी, मालविका बॅनर्जी, ए. टी. जयंती, हामिदा पार्कर, जोनाली बुरागोहेन, मीनाक्षी कुमार, सुजाता दत्ता सचदेवा, रेशमी चक्रवाती, किरण मनराल आणि संजरी चॅटर्जी यांचा समावेश आहे. याशिवाय डेक्कन क्रोनिकलच्या पत्रकार क्रिस्टिना फ्रान्सिस यांनीदेखील या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. 

 

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरCentral Governmentकेंद्र सरकारsexual harassmentलैंगिक छळJournalistपत्रकार