शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : अकबर यांच्या पत्नीकडून पाठराखण; ती पत्रकार खोटे बोलतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 16:04 IST

एम. जे. अकबर यांच्यावर अमेरिकेतील भारतीय महिला पत्रकारानेही बलात्काराचे आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भाजपचे नेते एम. जे. अकबर यांच्यावर अमेरिकेतील भारतीय महिला पत्रकारानेही कपडे फाडल्याचे आणि बलात्काराचे आरोप केले आहेत. यावरून अकबर यांची पत्नी मल्लिका अकबर यांनी एम. जे. यांची पाठराखण करत ती महिला पत्रकार खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. 

भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई 23 वर्षांपूर्वी एशियन एजमध्ये काम करत होती.  सध्या त्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये काम करतात. एशियन एजमध्ये असताना पल्लवी जयपूरमध्ये एका स्टोरीवर काम करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. दोनवेळा चुंबनाचे प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्यावेळी अकबर यांनी पल्लवी यांचे कपडे फाडले व बलात्कार केल्याचा आरोप पल्लवी यांनी केला आहे. याबाबतचे त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये सांगितले आहे. 

 

#MeToo : अकबर यांच्यावर आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप

याविरोधात एम. जे. अकबर यांची पत्नी मल्लिका यांनी पल्लवी गोगोई यांच्या हेतूवरच संशय व्यक्त केला आहे. पल्लवी खोटे का बोलत आहे, हे माहिती नाही. पण ते खोटेच आहे, असे त्यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे. 

तर एम. जे. अकबर यांनीही बलात्काराचे आरोप फेटाळताना पल्लवीशी आपले प्रेमसंबंध होते आणि तिच्या संमतीनेच सारे काही झाले होते, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरreporterवार्ताहरRapeबलात्कारSexual abuseलैंगिक शोषण