शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo: सहमतीने नव्हे, तर भीतीनं संबंध प्रस्थापित केले, पल्लवीचा अकबर यांच्यावर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 13:56 IST

माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर पल्लवी गोगोई यांनी पलटवार केला आहे.

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर पल्लवी गोगोई यांनी पलटवार केला आहे. सहमतीने नव्हे, तर भीतीनं संबंध प्रस्थापित झाल्याचा तिने पुनरुच्चार केला आहे. अकबर यांनी मला भीती दाखवून माझा चुकीच्या पद्धतीनं वापर करत संबंध प्रस्थापित केल्याचं ती म्हणाली आहे. पल्लवी गोगोईनं अकबर यांच्यावर केलेल्या आरोपांवर ती ठाम आहे. माझ्याबरोबर झालेल्या दुष्कृत्याची जबाबदारी घेण्याचं सोडून त्यांनी सहमतीनं संबंध प्रस्थापित झाल्याचं सांगितलं. मी माझ्या आधीच्या विधानावर कायम आहे. मी सत्य जगाला सांगत राहीन. जेणेकरून अकबर यांनी अशाच दुस-या महिलांवर केलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव होऊन त्या पुढे येतील. परंतु अकबर यांची पत्नी मल्लिका अकबर यांनी एम. जे. यांची पाठराखण करत ती महिला पत्रकार खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

(#MeToo : अकबर यांच्यावर आता अमेरिकेतील महिला पत्रकाराचा आरोप)

भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई 23 वर्षांपूर्वी एशियन एजमध्ये काम करत होती. यावेळी त्या 22 वर्षांच्या होत्या. सध्या त्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये काम करतात. एशियन एजमध्ये असताना पल्लवी जयपूरमध्ये एका स्टोरीवर काम करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. पल्लवीला पत्रकारितेची फारशी माहितीही नव्हती. पल्लवी या अकबर यांची पुस्तके वाचून प्रभावित झाल्या होत्या. 23च्या वयामध्ये त्यांना संपादकीय पानाची जबाबदारी देण्यात आली. यासाठी त्यांना राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलावे लागायचे. जसवंत सिंह, अरुण शौरी आणि नलिनी सिंह यांच्यासारख्या नेत्यांना फोन करावा लागत होता. पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार ही घटना 1994 मधली आहे. अकबर यांच्या केबिनमध्ये पल्लवी संपादकीय पान दाखविण्यासाठी गेल्या होत्या. ते काहीतरी चांगली हेडलाईन देतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी माझे चुंबन घ्यायला लागले. मला धक्काच बसला. मी तडक ऑफिसमधून निघाले. लाज वाटत होती. माझी मैत्रिण तुषिता हिला आजही तेव्हाच माझा चेहला आठवतो. तिने विचारल्यावर तिला खरेखरे सांगितले. तेव्हा ती एकटीच होती, असेही पल्लवी यांनी लेखात म्हटले आहे. (#MeToo : अकबर यांच्या पत्नीकडून पाठराखण; ती पत्रकार खोटे बोलतेय)

जयपूरमध्ये बलात्कारावेळी कपडेच फाडले....मुंबईच्या घटनेनंतर मला एका आडवळणाच्या गावात कामासाठी पाठविण्यात आले होते. यामुळे सकाऴी लवकर ऑफिसमध्ये जाऊन संपादकीय पानाचे काम संपवून पुन्हा त्या गावात रिपोर्टिंगसाठी जावे लागे. या गावात एका जोडप्याला काही लोकांनी फासावर लटकावले होते. मला देण्यात आलेले काम जयपूरमध्ये संपले होते. मात्र, अकबर यांनी सांगितले की जयपूरमध्येच ते या प्रकरणाच्या स्टोरीवर चर्चा करणार आहेत. यामुळे त्यांनी मला त्यांच्या हॉटेलच्या खोलीत बोलावले. दबावामुळे मी त्यांच्या खोलीत गेले. मात्र, त्यांनी माझे कपडे फाडले आणि बलात्कार केला. यावेळी मी त्यांना विरोधही केला. मात्र, पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पल्लवी यांनी या लेखामध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरSexual abuseलैंगिक शोषण