शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 17:09 IST

महिला सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात अजून एका महिला पत्रकाराने आवाज उठवला आहे.

नवी दिल्ली -  महिला सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात अजून एका महिला पत्रकाराने आवाज उठवला आहे. एम. जे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा किस केले. तसेच एकदातर ते चक्क अंतर्वस्त्रातच आपल्यासमोर आल्याचा आरोप महिला पत्रकार तुषिता पटेल यांनी केला आहे. स्क्रोल या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखामधून पटेल यांनी हा आरोप केला आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या अकबर यांच्यावर आतापर्यंत 15 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तुषिता पटेल यांना आपल्या लेखात लिहिले आहे की, "1992 साली आपण ट्रेनी म्हणून काम करत होते. त्यावेळी अकबर हे पत्रकारिता सोडून राजकारणात उतरले होते. दरम्यान अकबर हे कोलकाता येथे आले असता मी एका सहकाऱ्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर अकबर यांनी आपल्या घरी फोन करून बोलावण्यास सुरुवात केले. त्यांनी अनेकदा बोलावल्यावर भेटण्यास गेले असता त्यांनी चक्क अंतर्वस्त्रावरच असताना दरवाजा उघडला. त्यांचा तो अवतार पाहून मी घाबरले."या लेखात तुषिता यांनी अजून एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. 1993 साली अकबर डेक्कन क्रॉनिकलचे एडिटर इन चिफ असताना तुषिता या हैदराबाद येथे सिनिअर सब एडिटर पदावर कार्यरत होत्या. त्यावेळी वृत्तपत्रातील एका पानावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आपणास हॉटेलमध्ये बोलावले. तसेच तिथे आपल्याला अचानक पकडून वारंवार किस केले. असा आरोपही त्यांनी केला. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्यावर दाखल केलेल्या अब्रुनुसानीच्या दाव्यानंतर तुषिता पटेल यांनी हे आरोप केले आहेत. तसेच न्यायालयातही महिला त्यांचा सामना करतील असे तुषिता यांनी सांगितले. दरम्यान, परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. याप्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. एम. जे. अकबर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात 15 ऑक्टोबरला अब्रुनुकसानी खटला दाखल केला होता. करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी अकबर यांनी आपली बाजू मांडली असून, त्यांनी संबंधितांवर दावाही दाखल केला आहे. याबाबत अकबर यांच्या वकिलांनी सांगितले की, अकबर यांच्या बाजूनं लढण्यास 97 वकिलांची फौज तयार आहे.  ''लैंगिक शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष हमखास बाधते. बेजबाबदार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे'', असा इशारा देत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी या प्रकरणात अखेर आपले हात झटकले.

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरIndiaभारतJournalistपत्रकार