प्रादेशिक भाषांमध्ये इसिसचा संदेश
By Admin | Updated: December 24, 2015 00:05 IST2015-12-24T00:05:48+5:302015-12-24T00:05:48+5:30
इस्लामिक स्टेट इराक अॅन्ड सिरिया (इसिस) समर्थक काही घटकांनी हिंदी, तामिळ अशा प्रादेशिक भाषांमधून संदेश जारी केली असल्याची कबुली गृह राज्यमंत्री हरीभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली.

प्रादेशिक भाषांमध्ये इसिसचा संदेश
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट इराक अॅन्ड सिरिया (इसिस) समर्थक काही घटकांनी हिंदी, तामिळ अशा प्रादेशिक भाषांमधून संदेश जारी केली असल्याची कबुली गृह राज्यमंत्री हरीभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली.
इसीस समर्थक गटांकडून सोशल मीडियाचा वापर केला जात असून हिंदी, उर्दू, तामिळ, गुजराती आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधून मजकूर प्रसिद्ध केला जात आहे, असे चौधरी यांनी गोपनीय यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देताना एका लेखी उत्तरात स्पष्ट केले. सरकारने परिस्थितीवर करडी नजर ठेवण्याची प्रक्रिया अवलंबली असून इसीसमध्ये होणारी संभाव्य रोजगारभरती पाहता अशा गटांवर निगराणी ठेवण्याचे आदेश गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना देण्यात आले आहे. सायबर स्पेस संबंधी घडामोडींकडेही लक्ष दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)