सोशल मीडियावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने जनजागृती देवाच्या नावाने दुधाचा दुरुपयोग न करण्याचा संदेश
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
दुधाचा अपव्यय थांबवा : देवाला अभिषेकला घालण्याऐवजी गरिबांना द्या

सोशल मीडियावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने जनजागृती देवाच्या नावाने दुधाचा दुरुपयोग न करण्याचा संदेश
द धाचा अपव्यय थांबवा : देवाला अभिषेकला घालण्याऐवजी गरिबांना द्यानवी मुंबई : प्रत्येक गोष्टीत अपडेट राहण्यासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर केला जातो. या माध्यमांशी जोडलेल्या सर्व लोकांमध्ये जनजागृती करता यावी आणि अंधश्रध्देचा समूळ नाश व्हावा यासाठी सोशल मीडियाने पुढाकार घेतला आहे. सर्वात जास्त युजर संख्या असलेले व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून जनजागृतीही करता येते हे आज सोशल मीडियाने सिध्द करुन दाखविले. सकाळपासून या माध्यमांद्वारे एकच संदेश पोहोचविला जात होतो तो म्हणजे, शिवलिंगावर दुधाचा अभिषेक घालण्यापेक्षा तेच दूध रत्यावरच्या एखाद्या भिका-याला किंवा मुक्या प्राण्यांना पाजा. आजही आपल्याकडे कितीतरी लहान मुले आहेत की, ज्यांना दिवसभरात दुधाचा एक थेंबही मिळत नाही...याची जाणीव मीडियाद्वारे करण्यात आली. अशा गरजू मुलांना दुध देण्याऐवजी देवांच्या मुर्तीवर कित्येक लीटर दुधाचा अभिषेक घातला जातो. श्रध्देपोटी केलेला हा दूधाचा वापर खरेच निरर्थक आहे. हे दूध देवापर्यंत तर पोहोचत नाही तर जवळच्या नाल्यात किंवा गटारीत जमते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांची मंदिरात होणारी गर्दी, शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करण्यासाठी तासन्तास रांगेत उभे लोक....ही परिस्थिती होती सा-या शिवमंदीरांमधली. हे पाहता एक प्रश्न नक्कीच मनात घर करतो तो म्हणजे....ही श्रध्दा की अंधश्रध्दा? डोन्ट वेस्ट मिल्क असे म्हणून सेलिब्रिटींनीही टष्ट्वीट करुन लोकांमध्ये जनजागृती केली. व्हॉट्सॲप वरही सेव्ह मिल्क असा मेसेज पोहोचवला जात होता. फेसबुक वर युजर्सने दुधाचा योग्य वापर करा असा सामाजिक संदेश देऊन तसे फोटोही पेस्ट केले. (प्रतिनिधी)