शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दीव-दमण, दादरा-नगर हवेलीचे विलीनीकरण, लोकसभेत विधेयक सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 04:47 IST

दमण व दीव आणि दादरा व नगरहवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्याबद्दलचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मांडले.

नवी दिल्ली : दमण व दीव आणि दादरा व नगरहवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्याबद्दलचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मांडले. या प्रदेशाचा उत्तम कारभार करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे सरकारने म्हटले आहे.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने त्या प्रदेशाचे विभाजन केले होते. त्यातून जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. या निर्णयानंतर तीन महिन्यांनी दमण आणि दीव, दादरा व नगरहवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्याचे विधेयक केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सादर केले आहे. हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश गुजरातजवळ किनारपट्टी भागात आहे. त्यांच्या विलीनीकरणामुळे तिथे अधिक उत्तम कारभार करणे व अनेक कामांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होईल असा केंद्र सरकारचा दावा आहे. हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश परस्परांपासून अवघ्या ३५ कि.मी. अंतरावर असून, त्यांची स्वतंत्र सचिवालये आहेत.दादरा व नगरहवेलीमध्ये फक्त एकच जिल्हा आहे, तर दमण आणि दीवमध्ये दोन जिल्हे आहेत. या दोन केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून स्वतंत्र निधी देण्यात येतो. त्यांच्या विलीनीकरणानंतर हा प्रदेश दादरा, नगरहवेली, दमण, दीव अशा एकत्रित नावाने ओळखला जाण्याची शक्यता आहे, तसेच या प्रदेशाचे मुख्यालय दमण आणि दीवमध्ये असेल. सध्या देशामध्ये जम्मू-काश्मीर, लडाखसह नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत. दमण आणि दीव, दादरा व नगरहवेलीच्या विलीनीकरणानंतर देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या आठ होईल.आधी होत्या पोर्तुगिजांच्या वसाहतीदमण व दीव हा ११२ कि.मी.चा परिसर आहे. पूर्वी पोर्तुगीज वसाहत असलेला हा परिसर १९६१ मध्ये भारतात विलीन करून तो केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला. या भागातून लोकसभेचा एक खासदार निवडला जातो. दमण व दीवची लोकसंख्या २ लाख ४२ हजार ९११ इतकी आहे.दादरा आणि नगरहवेलीवर पोर्तुगिजांची १७८३ पासून सत्ता होती. हा भाग १९६१ साली भारतात विलीन करून केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दादरा आणि नगरहवेलीतून लोकसभेवर सध्या एक खासदार निवडून जातो. तेथील लोकसंख्या ३ लाख ४३ हजार ७०९ इतकी आहे.

टॅग्स :IndiaभारतParliamentसंसद