सीबीआयप्रमुखपदाच्या स्पर्धेत दयाळ
By Admin | Updated: November 30, 2014 02:06 IST2014-11-30T02:06:15+5:302014-11-30T02:06:15+5:30
भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) तीन ज्येष्ठ अधिका:यांची नावे स्पर्धेत आघाडीवार असून त्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांचाही समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रंनुसार कळते.

सीबीआयप्रमुखपदाच्या स्पर्धेत दयाळ
तीन नावे विचाराधीन : आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
नवी दिल्ली: केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) विद्यमान संचालक येत्या आठवडय़ात निवृत्त झाल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) तीन ज्येष्ठ अधिका:यांची नावे स्पर्धेत आघाडीवार असून त्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांचाही समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रंनुसार कळते.
आधीच्या कायद्यानुसार सीबीआय संचालकाची निवड करणा:या मडंळात पंतप्रधान व त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधीखेरीज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश होता. परंतु सध्याच्या लोकसभेत कोणीही मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसल्याने त्याऐवजी लोकसभेतील सर्वात मोठय़ा विरोधी पक्षाच्या नेत्याचा यात समावेश करण्याची कायदा दुरुस्ती दोनच दिवसांपूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाली आहे.
यामुळे निवड प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर सदस्यांची रविवारी बैठक होऊन नव्या सीबीआय संचालकाची निवड निश्चित केली जाईल, असे कळते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्दयाळ यांच्याखेरीज राजस्थानचे पोलीस महासंचालक ओमेंद्र भारद्वाज व केंद्रीय गृह मंत्रलयातील विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) प्रकाश मिश्र या तिघांची नावे अंतिम निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलावर पोहोचली आहेत, असे सूत्रंकडून कळते.
च्याखेरीज 1977 च्या तुकडीतील अभयानंद व अनिल सिन्हा व 1979 च्या तुकडीतील अरूप पटनाईक व शरद कुमार या ‘आयपीएस’ अधिका:यांची नावेही चर्चेत असल्याचे सूत्रंनी सांगितले. पटनाईक सध्या महाराष्ट्रात महामार्ग वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत.