शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दयावान पडद्याआड

By admin | Updated: April 28, 2017 03:16 IST

खलनायक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत नायक बनून चित्रपटांचा पडदा गाजविणारे, आत्मशोधार्थ संन्यास घेऊन सर्वांना चकित करणारे

मुंबई : खलनायक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत नायक बनून चित्रपटांचा पडदा गाजविणारे, आत्मशोधार्थ संन्यास घेऊन सर्वांना चकित करणारे आणि राजकीय क्षेत्रावरही आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना (७०) काळाच्या पडद्याआड गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोकसहवेदना व्यक्त केली. गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अक्षय, राहुल, साक्षी आणि मुलगी श्रद्धा तसेच पहिली पत्नी गीतांजली आणि दुसरी पत्नी कविता असा परिवार आहे.गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. ‘त्यावेळी विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्यासोबत काम केलेले नव्या पिढीचे अभिनेते उपस्थित नव्हते. हे लाजिरवाणे आहे. आपण दुसऱ्याचा आदर करायला शिकलं पाहिजे, असे टिष्ट्वट ऋषी कपूर यांनी केले.’ रुपेरी पडदा गाजविणारे आणि ‘आॅल टाइम हॅण्डसम’ अशी ओळख असलेले विनोद खन्ना यांच्यावर गिरगाव येथील एचएन रिलायन्स फाउंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे उपचार सुरू होते. १९६८ ते २०१३ या कालावधीत त्यांनी १४१ चित्रपटांत काम केले. ‘दयावान’सह अमर अकबर अँथोनी, द बर्निंग ट्रेन, मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, गद्दार, जेलयात्रा, इन्कार, कुर्बानी, कुदरत यांतील भूमिका विशेष गाजल्या. चित्रपटसृष्टीत कारकिर्द बहरत असतानाच १९८२ मध्ये त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला सोडचिठ्ठी देऊन ओशोंचे आश्रम गाठले. आत्मशोध आणि आत्मशांतीसाठी आपण संन्यास घेतल्याची त्यांनी घोषणा करताच चित्रपटसृष्टीला धक्का बसला. मात्र, पाच वर्षाच्या कालावधीत संन्याशाची वस्त्रे उतरवून त्यांनी सिनेसृष्टीत पुनरागमन केले. विनोद खन्ना यांनी बॉलिवूडबरोबरच राजकारणातही ठसा उमटविला होता. १९९८ साली पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. अटलिबहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात २००२मध्ये सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री होते. परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. २००९चा अपवाद वगळता १९९८, २००४ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. विनोद खन्ना यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली. निर्माता करण जोहर याने ‘बाहुबली २’ चा प्रिमियर रद्द केला, तर महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन गुंडाळून रुग्णालयाकडे धाव घेतली. खन्ना यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा साक्षी याने त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला. यावेळी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)