ग्राहक मंचाची मर्सिडीज बेन्झ, ऑटो हँगरला नोटीस--------2

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:21+5:302015-01-23T23:06:21+5:30

ते दर्डा यांनी ताबडतोब भरले़ परंतु नंतर दहाच दिवसात २५ एप्रिलला चालकाला कार नीट चालत नसल्याचे आढळून आले़ त्यामुळे कार पुन्हा वर्कशॉपमध्ये गेली़ यावेळी फाऊंडेशन बुशेस कटत असल्याचे लक्षात आले व त्यापोटी कंपनीने पुन्हा दुरुस्तीसाठी २ लाख ९९ हजार रुपयांची मागणी केली़

Mercedes Benz, Auto Hangar Notice to Customer Forum -------- 2 | ग्राहक मंचाची मर्सिडीज बेन्झ, ऑटो हँगरला नोटीस--------2

ग्राहक मंचाची मर्सिडीज बेन्झ, ऑटो हँगरला नोटीस--------2

दर्डा यांनी ताबडतोब भरले़ परंतु नंतर दहाच दिवसात २५ एप्रिलला चालकाला कार नीट चालत नसल्याचे आढळून आले़ त्यामुळे कार पुन्हा वर्कशॉपमध्ये गेली़ यावेळी फाऊंडेशन बुशेस कटत असल्याचे लक्षात आले व त्यापोटी कंपनीने पुन्हा दुरुस्तीसाठी २ लाख ९९ हजार रुपयांची मागणी केली़
यावर कार २० दिवस तुमच्याजवळ असताना फाऊंडेशन बुशेसमध्ये बिघाड झाला हे तुमच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न दर्डा यांनी उपस्थित केला व यावरून कंपनीचे डिलर ऑटो हँगर यांनी कारची तपासणी योग्य पद्धतीने केली नाही व आपल्याला निकृष्ट ग्राहक सेवा पुरवली, असा पवित्रा घेऊन दर्डा यांनी कंपनीने कार विनामूल्य दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी केली़
यानंतर दर्डा यांनी कंपनीला हा सर्व घटनाक्रम नमूद करून अनेक ई-मेल्स पाठवले पण त्यावर कंपनीने किंवा त्यांच्या डिलरने कुठलेही योग्य उत्तर दिले नाही़
आपल्या पत्रांमध्ये दर्डा यांनी एअरमॅटिक सस्पेंशन सिस्टिम बेभरवशाची असून ती भारतीय रस्त्यांसाठी उपयुक्त नाही, असे असतानाही ही प्रणाली वापरून मर्सिडीज बेन्झ ग्राहकांचा जीव धोक्यात टाकत आहे, असा आरोप केला़ आपल्या कारच्या बाबतीत कार एका जागी उभी असताना एअरमॅटिक सस्पेंशन प्रणाली अचानक खराब झाली त्यामुळे फार नुकसान झाले नाही़ पण, हाच अपघात कार वेगात असताना घडला असता तर आतील प्रवाशांवर कुठले संकट ओढवले असते याची कल्पनाच करता येत नाही, असेही दर्डा यांनी म्हटले आहे़ मजेची बाब म्हणजे, या कारचे सुमारे ५५० पानांचे ओनर्स मॅन्युअल आहे. त्यामध्ये एअरमॅटिक सस्पेंशनच्या दुरुस्तीबाबत कुठेही माहिती दिलेली नाही़ ही माहिती लपवून मर्सिडीज बेन्झ ग्राहकांची फसवणूक करीत आहे, असाही आरोप दर्डा यांनी केला़ पण, त्याला कंपनीने अजूनही उत्तर दिलेले नाही़ दर्डा यांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याबरोबर कंपनीने २ लाख ९९ हजार रुपयांऐवजी २ लाख ५ हजार रुपयांत कार दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली़ वाहन जास्त दिवस नादुरुस्त ठेवणे योग्य नव्हे हे जाणून दर्डा यांनी वाहन ऑगस्ट महिन्यात दुरुस्त करून घेतले़ परंतु पुन्हा यवतमाळात असतानाच ऑक्टोबरमध्ये नादुरुस्त झाले व ते नागपूरपर्यंत दुसऱ्या वाहनाने ओढून आणावे लागले़

Web Title: Mercedes Benz, Auto Hangar Notice to Customer Forum -------- 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.