उत्तर प्रदेशातील दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:32+5:302015-01-29T23:17:32+5:30
लखनौ-उत्तर प्रदेशचे बसपा आमदार उमा शंकर सिंग व भाजपा आमदार बजरंग बहादूर सिंग यांचे विधानसभेचे सदस्यत्व लोकायुक्तांच्या शिफारशीनुसार रद्द करण्याचे आदेश राज्यपाल राम नाईक यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द
ल नौ-उत्तर प्रदेशचे बसपा आमदार उमा शंकर सिंग व भाजपा आमदार बजरंग बहादूर सिंग यांचे विधानसभेचे सदस्यत्व लोकायुक्तांच्या शिफारशीनुसार रद्द करण्याचे आदेश राज्यपाल राम नाईक यांनी दिले आहेत. राज्यपालांनी बलियाच्या रसडा विधानसभा जागेवरून बहुजन समाजाचे आमदार उमा शंकर सिंग व महाराजगंजच्या फरेंदा मतदार संघाचे आमदार बजरंग बहादूर सिंग यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. विधानसभेवर निवडून आल्यानंतरही हे दोघे आमदार कंत्राटदार म्हणून काम करीत असल्याबद्दल लोकायुक्त एन.के. मेहरोत्रा यांनी त्यांना दोषी ठरविले होते. उमाशंकर सिंग हे २००९ पासून रस्ते बांधणीची सरकारी कंत्राटे घेत होते. तर बजरंग बहादूर सिंग यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर १५ ऑक्टोबर २०१२ रोजी रस्ते बांधणीचे कंत्राट बांधकाम विभागाकडून घेतले होते.निवडणूक आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्यपालांनी ६ मार्च २०१२ पासून उमा शंकर सिंग तर १५ ऑक्टोबर २०१२ पासून बजरंग बहादूर सिंग यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.