दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द

By Admin | Updated: January 30, 2015 05:59 IST2015-01-30T05:59:25+5:302015-01-30T05:59:25+5:30

उत्तर प्रदेशचे बसपा आमदार उमाशंकर सिंग व भाजपा आमदार बजरंग बहादूर सिंग यांचे विधानसभेचे सदस्यत्व लोकायुक्तांच्या शिफारशीनुसार रद्द करण्याचे आदेश राज्यपाल राम नाईक यांनी दिले आहेत.

The membership of the two legislators is canceled | दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द

दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द

लखनौ : उत्तर प्रदेशचे बसपा आमदार उमाशंकर सिंग व भाजपा आमदार बजरंग बहादूर सिंग यांचे विधानसभेचे सदस्यत्व लोकायुक्तांच्या शिफारशीनुसार रद्द करण्याचे आदेश राज्यपाल राम नाईक यांनी दिले आहेत.
राज्यपालांनी बलियाच्या रसडा विधानसभा जागेवरून बहुजन समाजाचे आमदार उमाशंकर सिंग व महाराजगंजच्या फरेंदा मतदारसंघाचे आमदार बजरंग बहादूर सिंग यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. निवडून आल्यानंतरही हे दोघे आमदार कंत्राटदार असल्याबद्दल लोकायुक्त एन. के. मेहरोत्रा यांनी त्यांना दोषी ठरविले होते. उमाशंकर सिंग हे २००९ पासून रस्ते बांधणीची सरकारी कंत्राटे घेत होते, तर बजरंग बहादूर सिंग यांनी १५ आॅक्टोबर २०१२ रोजी रस्ते बांधणीचे कंत्राट बांधकाम विभागाकडून घेतले होते.

Web Title: The membership of the two legislators is canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.