अश्लील फोटोला विरोध करणा-या व्हाट्सअॅप अॅडमिनला सदस्यांनीच धुतला
By Admin | Updated: August 23, 2016 14:39 IST2016-08-23T14:39:55+5:302016-08-23T14:39:55+5:30
व्हाट्सअॅप ग्रुपवर अश्लील फोटो टाकण्यास विरोध केला म्हणून अॅडमिनला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

अश्लील फोटोला विरोध करणा-या व्हाट्सअॅप अॅडमिनला सदस्यांनीच धुतला
>- ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. 23 - व्हाट्सअॅप ग्रुपवर अश्लील फोटो टाकण्यास विरोध केला म्हणून अॅडमिनला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याच्याच ग्रुपमधील सदस्य होते. पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शास्त्रीनगरमध्ये राहणा-या राज कुमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. राज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला होता. ज्यामध्ये ग्रुपमधील सदस्य नरिंदर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवत असे. राज कुमार यांनी नरिंदरला अशा गोष्टी शेअर करण्यापासून रोखलं होतं. याचा राग मनात धरुन नरिंदरने आपल्या मित्रांसोबत राजकुमारला रस्त्यात अडवून मारहाण केली.
काही दिवसांपुर्वी व्हाट्सअॅपवर मित्रांसोबत झालेल्या भांडणामुळे एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. तसंच अश्लील आणि आक्षेपार्ह गोष्टी शेअर केल्याबद्दल अॅडमिनला अटक करण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.