खासदारांच्या निवा:याचा प्रश्न अजूनही न सुटण्याची चिन्हे
By Admin | Updated: August 24, 2014 02:21 IST2014-08-24T02:21:04+5:302014-08-24T02:21:04+5:30
खासदारांना त्यांच्या दर्जानुसार ल्युटेन भागातील बंगले आणि फ्लॅट वितरित करण्यात येईर्पयत तात्पुरते निवासस्थान असलेल्या ‘विठ्ठलभाई पटेल हाऊस’ (व्हीपी हाऊस) होस्टेलमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे.

खासदारांच्या निवा:याचा प्रश्न अजूनही न सुटण्याची चिन्हे
फराज अहमद - नवी दिल्ली
खासदारांना त्यांच्या दर्जानुसार ल्युटेन भागातील बंगले आणि फ्लॅट वितरित करण्यात येईर्पयत तात्पुरते निवासस्थान असलेल्या ‘विठ्ठलभाई पटेल हाऊस’ (व्हीपी हाऊस) होस्टेलमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे. अनेक माजी खासदार आणि त्यांच्या पाहुण्यांनी व्हीपी हाऊसमधून हुसकावले जाण्याआधी छत शोधण्यासाठी धावपळ चालविली आहे. खासदारांना कायमचे वास्तव्याचे ठिकाण मिळेर्पयत या होस्टेलमधील 172 किचन अटॅच पॉश खोल्या, चांगल्या प्रसाधनगृहांचा वापर करता येईल.
यापैकी 5क् खोल्या रिकाम्या करण्यात आल्या असून अनेक खोल्या लवकरच रिक्त केल्या जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचा:यांनी सांगितले. ते सध्या रिक्त खोल्यांमध्ये नवे सोफे, बेड, फ्रीज आणि अन्य सुविधा पुरविण्यात व्यग्र आहेत. प्रत्येक घर आणि फ्लॅटची लोकसभा आणि राज्यसभा कोटय़ात विभागणी करण्यात आली असून दोन्ही सभागृहातील सदस्यांना घरांचे वाटप करण्याचे काम त्या त्या सभागृहाची समिती करीत आहे. विश्वंभर दास मार्गावरील बहुमजली नवे फ्लॅटस् केवळ खासदारांनाच वितरित केले जाणार असल्याचे सूत्रंनी सांगितले.
4व्ही.पी. हाऊस अनेकांचे गेल्या काही दशकांपासून कायमचे वास्तव्याचे ठिकाण बनले आहे. अनेक जण आता खासदार नाहीत. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना कुंवर दानिश अली सारखे नेते 1क् वर्षापेक्षा अधिक काळापासून तेथे राहात आहेत.
4दिवंगत माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांचे सहायक राहिलेले वसिम अहमद हे फार कमी काळ राज्यसभा सदस्य होते. त्यांच्यासह हरीकेश बहादूर, भीमसिंग यांच्यासारखे अनेक किती वर्षापासून राहात आहेत, हे कुणालाच माहीत नाही. बहादूर हे 198क् च्या दशकापूर्वी संसद सदस्य होते. तेव्हापासून ते राहात आहेत.
4जम्मू-काश्मीरचे भीमसिंग यांनी राजवट कुणाचीही असो 17, व्ही.पी. हाऊस हे ठिकाण सोडलेले नाही. त्यांनी ‘व्हाईस ऑफ मिलियन’ हे नियतकालिकही याच ठिकाणाहून चालवले. यावेळीही त्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान संबंधित अधिका:यांना पेलावे लागणार आहे.
4खासदार नसलेले पी. मुरलीधर राव सध्या भाजपाचे सरचिटणीस बनले असून भीमसिंग हे गेल्या दोन-तीन वर्षापासून त्यांच्यासोबत राहात आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनीही पाहुण्यांसाठी असलेल्या खोल्या अनेक वर्षापासून रिकाम्या केलेल्या नाहीत. नव्या सरकारने अशा प्रकारचे वास्तव्य खपवून घेणार नसल्याचा बडगा उगारल्याने सध्या अनेकांनी घर शोधण्यासाठी धावधाव सुरू केली आहे.