शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Mehul Choksi: त्या मिस्ट्री गर्लबाबत आता मेहूल चोक्शीच्या पत्नीने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:22 IST

Mehul Choksi Extradition Case Update: परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी मेहूल चोक्शी सध्या डोमिनिका देशाच्या ताब्यात आहे. त्याला डोमिनिकामधून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी मेहूल चोक्शी सध्या डोमिनिका देशाच्या ताब्यात आहे. त्याला डोमिनिकामधून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मेहूल चोक्शीची पत्नी प्रीती मोहन हिने काही धक्कादायक दावे केले आहेत. मेहूल चोक्शीच्या जीवितास धोका असल्याची भीती तिने व्यक्त केली आहे. तसेच मेहूल चोक्शीसोबत डोमिनिकाच्या समुद्र किनाऱ्यावर यॉटमध्ये दिसलेली तरुणी आपल्या ओळखीची असल्याचेही तिने सांगितले आहे. (Mehul Chokshi's wife made a big secret statement about that Mystery Girl )बिझनेस स्टॅंडर्डला दिलेल्या मुलाखतीत प्रीती चोक्शीने सांगितले की, तिचे पती २३ मे रोजी संध्याकाळी भोजन घेण्यासाठी गेले होते. मात्र ते परत आले नाहीत. प्रीती चौक्शीने सांगितले की, मेहूल चोक्शला शोधण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर एक सल्लागार आणि आचाऱ्याला पाठवले मात्र काहीच माहिती न मिळाल्याने शेवटी पोलिसांशी संपर्क साधला.  मेहूल चोक्शीच्या पत्नीला मिस्ट्री गर्ल बारबरा जेबरिकाबाबत विचारले असता तिने सांगितले की, जेबरिका ही गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अँटिगा येथे आली होती. ती या बेटावरील आमच्या दुसऱ्या घरातही आली आहे. तेथील शेफसोबत तिची मैत्री झाली होती. 

दरम्यान, जेबरिका ही सेक्सी फिमेल फेटेल असल्याच्या आंतरराष्ट्रीय माध्यमातील दाव्यांचे प्रीती चोक्शीने खंडन केले आहे. बारबरा वेगळी दिसते.  मात्र ती जशी दिसते तशी नाही आहे. तिच्याकडे एक चांगले शरीर असू शकते. ती गोष्ट नाहीये. पण हा फोटो तिचा नाही.  प्रकृतीच्या समस्यांमुळे माझे पती मेहूल चोक्शी यांनी तीन वर्षांपासून हे बेट सोडलेले नाही. त्यांना वकिलांना भेटण्याची किंवा वैद्यकीय सुविधा घेण्याचीही परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत मला त्यांना ठार मारले जाईल, अशी भीती मला वाटते. प्रसारमाध्यमे म्हणताहेत की चोक्शी फरार झाला आहे. मात्र भारतीय घटनेतील कलम ९ अनुसार मेहूल चोक्शी हा आता भारतीय नागरिक नाही. त्याने २०१७ मध्ये अँटिगाचे नागरिकत्व स्वीकारले. त्याच्यासाठी जगातील ही सर्वात सुरक्षित जागा आहे.  दरम्यान, मेहूल चोक्शीबाबत आझ डोमिनिकातील न्यायालय निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाबाबत न्यायालय आदेश देऊ सकते. १ जून रोजी भारताने डोमिनिका पोलिसांसोबत न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात मेहूल चोक्शीच्या भारतीय पासपोर्टची प्रत होती. त्याआधारे मेहूल हा भारतीय नागरिक असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला होता.  

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCourtन्यायालयIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय