मेहबूबा मुफ्ती विजयी !

By Admin | Updated: June 26, 2016 02:18 IST2016-06-26T02:18:28+5:302016-06-26T02:18:28+5:30

जम्मृू-काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा अनंतनाग मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत १२ हजार मतांनी विजय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mehbooba Mufti won! | मेहबूबा मुफ्ती विजयी !

मेहबूबा मुफ्ती विजयी !

श्रीनगर : जम्मृू-काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा अनंतनाग मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत १२ हजार मतांनी विजय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
शनिवारी झालेल्या मतमोजणीत मेहबूबा यांना १७,७०१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हिलाल अहमद शाह यांना केवळ ५,६१६ मतांवर समाधान मानावे लागले. नॅशनल कॉन्फरन्सचे हुसेन मिसगर यांना २,८११ मते पडली. उर्वरित पाच उमेदवारांपैकी अनेकांची अनामत जप्त झाली. (वृत्तसंस्था)

Web Title: Mehbooba Mufti won!