मोबाईल विक्रेत्यांची पोलिसांंनी घेतली बैठक
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:47+5:302015-09-03T23:05:47+5:30
पुणे : दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी गुन्हे शाखेच्यावतीने शहरातील मोबाईल व सीमकार्ड विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. पोलीस मुख्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला ७०० जणांची उपस्थिती होती.

मोबाईल विक्रेत्यांची पोलिसांंनी घेतली बैठक
प णे : दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी गुन्हे शाखेच्यावतीने शहरातील मोबाईल व सीमकार्ड विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. पोलीस मुख्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला ७०० जणांची उपस्थिती होती. आगामी गणोत्सवामध्ये दहशतवादी कारवाया घडू नयेत याकरिता घेण्यात आलेल्या बैठकीला विविध मोबाईल कंपन्यांचे शहरातील प्रतिनिधी, सिमकार्ड पुरवणारे वितरक, विक्रेते यांनी उपस्थिती लावली. सिमकार्डची विक्री करताना प्रामुख्याने दक्षता घ्यावी तसेच ग्राहकाची मुळ कागदपत्र तपासूनच सिमकार्ड देण्यात यावे अशा सुचना देण्यात आल्या. सिमकार्ड देण्यासाठीचा फॉर्म भरुन संबंधिताचा फोटो घेणे, त्याचा पर्यायी मोबाईल नंबर घेऊन त्यावर संपर्क साधणे, अंगठ्याचे ठसे व ग्राहकांची नोंद ठेवण्याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या बैठकीमध्ये सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी, पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.