मेळावे, प्रत्यक्ष संपर्कातून प्रचारास वेग शेतकी संघ निवडणूक : ७ रोजी मतदान, ८ रोजी सकाळी आठपासून मतमोजणी

By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:01+5:302016-02-05T00:33:01+5:30

जळगाव- मेळावे आणि प्रत्यक्ष संपर्क या माध्यमातून तालुका शेतकरी खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे.

Meetings, direct contact through campaigning Agriculture Seats Election: Polling on 7th, counting of votes from 8am on 8th | मेळावे, प्रत्यक्ष संपर्कातून प्रचारास वेग शेतकी संघ निवडणूक : ७ रोजी मतदान, ८ रोजी सकाळी आठपासून मतमोजणी

मेळावे, प्रत्यक्ष संपर्कातून प्रचारास वेग शेतकी संघ निवडणूक : ७ रोजी मतदान, ८ रोजी सकाळी आठपासून मतमोजणी

गाव- मेळावे आणि प्रत्यक्ष संपर्क या माध्यमातून तालुका शेतकरी खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे.
लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांचे सर्वसामान्य शेतकरी पॅनल व भाऊसाहेब पाटील यांच्या सहकार विकास पॅनलमध्ये लढत होत आहे. सर्वसामान्य शेतकरी पॅनलने सर्व १५ जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरविले असून, सहकार विकास पॅनलने संस्था मतदारसंघात पाच आणि व्यक्तीश: मतदारसंघात एक उमेदवार दिला आहे. निवडणुकीत १५ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १८ उमेदवार संस्था मतदारसंघात आहेत.
प्रचारासाठी अवचित हनुमान मंदिर येथे मेळावे झाले आहेत. तसेच गावोगावी जाऊन प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधून उमेदवार आपली बाजू घ˜ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच विविध गावांमध्ये मतदारांनी आपले फलक, पत्रके लावली आहेत.
लुंकड शाळेत मतदान
७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. ५ रोजी प्रचार थांबणार आहे. संस्था मतदारसंघात ७२ मतदार असून, व्यक्तीश मतदारसंघात ३०३२ मतदार मतदान करतील. मतदानासाठी सहा केंद्र निश्चित केले आहेत. एका केंद्रावर ५०० मतदार मतदान करतील. ख्वाजॉमियॉ भागातील प.न.लुंकड कन्या शाळेत सर्व सहा केंद्र असतील. ७ रोजी सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर होईल. ५० कर्मचारी मतदान प्रक्रियेसंबंधी नियुक्त केले आहेत.
८ रोजी मतमोजणी
मतमोजणी ८ रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होईल. ही प्रक्रिया गणेश कॉलनीमध्ये देखरेख संघाच्या सभागृहात पार पडेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अशोक बागुल यांनी दिली.

Web Title: Meetings, direct contact through campaigning Agriculture Seats Election: Polling on 7th, counting of votes from 8am on 8th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.