सागर पार्क प्रकरणी पोलीस मनपा प्रशासनात होणार बैठक
By Admin | Updated: February 5, 2016 00:34 IST2016-02-05T00:34:11+5:302016-02-05T00:34:11+5:30
जळगाव : सागर पार्कवरील हॉकर्सने गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन जागेच्या विषयावर निर्णय घेण्याची मागणी केली. या विषयावर आता महापालिका शुक्रवारी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार याप्रकश्नी एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्याविषयी पत्र देणार आहे.

सागर पार्क प्रकरणी पोलीस मनपा प्रशासनात होणार बैठक
ज गाव : सागर पार्कवरील हॉकर्सने गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन जागेच्या विषयावर निर्णय घेण्याची मागणी केली. या विषयावर आता महापालिका शुक्रवारी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार याप्रकश्नी एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्याविषयी पत्र देणार आहे. सोमवारपासून सागरपार्कवर हॉकर्सने खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्या लावल्या होत्या. दोन दिवस या गाड्या तेथे होत्या. मात्र शुक्रवारी पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्तांमध्ये झालेल्या चर्चेनंतर रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले हे सागर पार्कवर पोहोचले. त्याच वेळी अतिक्रमण विभागाचे पथकही तेथे गेले. या ठिकाणी हॉकर्सने काही काळ कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन केले होते. मात्र पोलिसांच्या सूचनेनंतर तेथे असलेल्या २० ते २२ खाद्य पदार्थांच्या गाड्या काढून घेण्यात आल्या. पदाधिकारी आयुक्तांकडेदरम्यान, आज हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे गेले होते. सागरपार्कवर गाड्या लावू द्या अन्यथा पर्यायी जागा द्या अशी त्यांनी मागणी केली. यावर आयुक्त संजय कापडणीस यांनी अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांना बोलावून याप्रश्नी आता पोलीस अधीक्षकांना पत्र देण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सागरपार्क हॉकर्सच्या जागेबाबत संयुक्त बैठकीचे आदेश केले होेत. त्यानुसार बैठकीची तारीख कळवावी असे शुक्रवारी पत्र दिले जाणार आहे.