अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन खात्याची बैठक
By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST
नागपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन खात्याची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या भागातील जिल्ांच्या वार्षिक योजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.
अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन खात्याची बैठक
नागपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन खात्याची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या भागातील जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.२०१५-१०१६ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्यासाठी ६८५ कोटींचा प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यापैकी सरकार यंदा किती रकमेला मंजुरी देते याकडे लक्ष लागले आहे. २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत यंदा वार्षिक योजनेत घसघशीत वाढ केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. शहरासाठीही डीपीसीतून अधिक निधी द्यावा, अशी मागणी महापालिकेच्या सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)