लोकसभाध्यक्षांनी बोलावली बैठक
By Admin | Updated: February 19, 2015 01:35 IST2015-02-19T01:35:48+5:302015-02-19T01:35:48+5:30
संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी येत्या २२ फेबु्रवारीला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे़

लोकसभाध्यक्षांनी बोलावली बैठक
नवी दिल्ली : संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी येत्या २२ फेबु्रवारीला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे़ या अधिवेशनात सहा
वटहुकूम विधेयकरूपात पारित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेबु्रवारीला सुरू होऊन ८ मे रोजी संपेल़ लोकसभाध्यक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (२२ फेबु्रवारी) सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे़ मोदी सरकार आपला पहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. गतवर्षी मे महिन्यात मोदी सरकार सत्तेत आले होते़
यादरम्यान कोळसा, खाण व खनिज, ई-रिक्षा, भू-संपादन आणि विमा क्षेत्रात एफडीआय अशा वटहुकूमांवरील विधेयके पारित करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)