काँग्रेस अध्यक्षांची दर्डांनी घेतली भेट

By Admin | Updated: July 24, 2015 23:15 IST2015-07-24T23:15:17+5:302015-07-24T23:15:17+5:30

राज्यसभा खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया

The meeting of the Congress President, Darde | काँग्रेस अध्यक्षांची दर्डांनी घेतली भेट

काँग्रेस अध्यक्षांची दर्डांनी घेतली भेट

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकारण हा उभयतांतील चर्चेचा मुद्दा होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सरकार आल्यानंतरची महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरे आणि स्थितीबाबत काँग्रेस श्रेष्ठींनी दर्डा यांच्याकडून जाणून घेतले. राज्य सरकारमध्ये सामील शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणानंतरही भाजप-सेनेत कसे संबंध आहेत, हे सोनियांना जाणून घ्यायचे होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The meeting of the Congress President, Darde