अंध-अपंगांचे साहित्य संमेलन
By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:06+5:302015-06-12T17:38:06+5:30
सक्षम देवगिरी प्रांत व मराठवाडा असोसिएशन ऑफ ब्लाईक यांच्या वतीने अखिल भारतीय अंध-अपंगांचे साहित्य संमेलन येत्या २० व २१ जून रोजी नांदेडात होणार आहे़ शंकरराव चव्हाण सभागृहात होणार्या या संमेलनाला देशभरातील अंध-अपंग उपस्थित राहणार आहेत़

अंध-अपंगांचे साहित्य संमेलन
स ्षम देवगिरी प्रांत व मराठवाडा असोसिएशन ऑफ ब्लाईक यांच्या वतीने अखिल भारतीय अंध-अपंगांचे साहित्य संमेलन येत्या २० व २१ जून रोजी नांदेडात होणार आहे़ शंकरराव चव्हाण सभागृहात होणार्या या संमेलनाला देशभरातील अंध-अपंग उपस्थित राहणार आहेत़या साहित्य संमेलनाकरीता मनपाचे आयुक्त व महापौर यांनी एक लाख रुपयांची आर्थिक सहाय्य घोषित केले आहे़ तसेच आ़हेमंत पाटील, आ़प्रताप पाटील चिखलीकर, आ़डी़पी़सावंत, संतुक हंबर्डे, डॉ़धनाजीराव देशमुख, राजेश पवार, चैतन्य बापू देशमुख, दिलीप ठाकूर, संतोष वर्मा, किशोर भवरे, डॉ़अजित गोपछडे, मोहनराव पाटील टाकळीकर, प्रविण साले, सुधाकर पांढरे, डॉ़हंसराज वैद्य, आनंदवन मित्र परिवाराने मदतीचा हात पुढे केला आहे़ या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव बी़डी़शिंदे यांनी केले आहे़