शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी नेत्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 5:40 AM

विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील मतभेद दूर व्हावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला आदी नेत्यांची बैठक झाली.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील मतभेद दूर व्हावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला आदी नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षांतील मतभेद दूर करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.आम आदमी पक्षातर्फे आज सकाळी जंतरमंतरवर ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा या मागणीसाठी झालेल्या धरणे आंदोलनात राहुल गांधी वगळता वरील सर्वच नेते सहभागी झाले होते. याशिवाय माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, शरद यादव, सपाचे राम गोपाल यादव यांनीही धरणे आंदोलनात भाग घेतला. त्याचवेळी शरद पवार यांच्याकडे रात्री नेत्यांनी जमण्याचा निर्णय झाला. याची माहिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनीही बैठकीत सहभागी होण्याचे ठरविले आणि त्यानुसार तेही पवार यांच्या निवासस्थानी आले.ममता बॅनर्जी त्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये गेल्या, तेव्हा यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी हास्यवदनाने त्यांचे स्वागत केले. पण तुमचे काँग्रेस कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये आपल्याला विरोध करतात, असे प्रत्युत्तर ममता यांनी त्यांना दिले. त्यावर राजकारण तर सुरूच राहील, पण मैत्री सोडून कसे चालेल, असे म्हणून सोनिया गांधी तिथून गेल्या. मात्र नंतर पत्रकारांंच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आमचा शत्रू आहे. पण दिल्लीत भाजपाच्या विरोधात आम्ही मित्र आहोत. आमचा राज्यात काँग्रेसशी असलेला विरोध कायम राहील.जागावाटपाचा विषय नाहीत्याआधी जंतरमंतरवरील धरणे आंदोलनात बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात आम्ही सारे विरोधक एकत्र आहोत, याची ग्वाही दिली.पण या धरणे आंदोलनात काँग्रेसचे केवळ आनंद शर्माच सहभागी होते.त्यामुळे विरोधकांतील मतभेद दूर करण्यासाठीच पवार यांच्याकडे ही बैठक झाली. त्यात जागावाटप वा निवडणुकीशी थेट संबंधित विषय नव्हता.मात्र विरोधकांच्या १0 शहरांत व्हावयाच्या महामेळाव्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९