जिल्ातील १२२५ शिपाई अतिरिक्त राज्यातील संघटनांची आज कोल्हापुरात बैठक
By Admin | Updated: December 11, 2014 23:54 IST2014-12-11T21:37:20+5:302014-12-11T23:54:20+5:30
तुरंबे : राज्यातील माध्यमिक शाळांतील हजारो शिपाई अतिरिक्त झाले आहेत. कोल्हापूर जिल्ातील १२२५ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त आहेत. समायोजनानंतर ८५५ शिपाई शिल्लक राहणार असल्यामुळे या कर्मचार्यांचे समायोजन कोठे व कसे करायचे, हा प्रश्न प्रशासनापुढे आहेत. मात्र, यापुढे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असणार्या शाळांमध्ये एक आणि पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये दोनच शिपाई राहणार असल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शाळाप्रमुखांसमोर आहे. या संदर्भात शासनाला पुनर्विचार करण्यास भाग पाडण्यासाठी उद्या, शुक्रवारी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक कोल्हापूर येथे होणार आहे.

जिल्ातील १२२५ शिपाई अतिरिक्त राज्यातील संघटनांची आज कोल्हापुरात बैठक
तुरंबे : राज्यातील माध्यमिक शाळांतील हजारो शिपाई अतिरिक्त झाले आहेत. कोल्हापूर जिल्ातील १२२५ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त आहेत. समायोजनानंतर ८५५ शिपाई शिल्लक राहणार असल्यामुळे या कर्मचार्यांचे समायोजन कोठे व कसे करायचे, हा प्रश्न प्रशासनापुढे आहेत. मात्र, यापुढे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असणार्या शाळांमध्ये एक आणि पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये दोनच शिपाई राहणार असल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शाळाप्रमुखांसमोर आहे. या संदर्भात शासनाला पुनर्विचार करण्यास भाग पाडण्यासाठी उद्या, शुक्रवारी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक कोल्हापूर येथे होणार आहे.
नवीन आरटीटीई ॲक्टनुसार विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची पद निश्चिती होत आहे. २०१३-१४ च्या सत्र मान्यतेनुसार १२२५ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाले. यापैकी संस्था स्तरावर ३७० शिपाई पदांचे समायोजन होणार आहे, तर उर्वरित ८५५ शिपाई समायोजन करूनही शिल्लक राहणार आहेत. या कर्मचार्यांचे पगार संबंधित शाळांतून ऑफलाईनच होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ात ८५० माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये पाचवी ते दहावी व आठवी ते दहावी असा स्तर आहे. शिपाई रजेवर गेल्यास वर्ग स्वच्छता, पिण्याचे पाणी, कार्यालयीन कामकाज, शालेय पोषण आहाराची देखभाल यासाठी शाळाप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
विद्यार्थी संख्यामान्य शिपाई पदे
१ ते २०० पर्यंत १
२०१ ते ४००२
४०१ ता ६००३
६०१ ते ८००४
८०१ ते १२००५