बेरोजगार विद्युत अभियंत्यासाठी मेळावा

By Admin | Updated: August 1, 2015 00:19 IST2015-08-01T00:19:02+5:302015-08-01T00:19:02+5:30

Meet for the unemployed electrical engineer | बेरोजगार विद्युत अभियंत्यासाठी मेळावा

बेरोजगार विद्युत अभियंत्यासाठी मेळावा

>महावितरण : तरू णांचा उत्फुुर्त प्रतिसाद
नागपूर : महावितरणच्या नागपूर शहर परिमंडलातर्गंत येणाऱ्या काँग्रेसनगर व बुटीबोरी विभागातील उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल व दुरूस्तीची कामे थेट बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पद्घतीने देण्यासाठी शुक्रवारी बुटीबोरी येथे खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सिडको कॉलनी, मेघदुत सिटी येथे हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला तरू णांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय ३ ऑगस्ट रोजी रहाटे कॉलनी चौकातील साईकृपा मंगल कार्यालयात पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महावितरणचे काम करण्यास इच्छुक बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी या मेळव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले आहे. यापुढे महावितरणच्या विभागातर्गंत एकूण वार्षिक कामांपैकी किमान ५० टक्के ठराविक नवीन आणि देखभाल व दुरूस्तीची कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पद्घतीने देण्यात येणार आहे. यात पहिल्या वर्षी प्रत्येकी १० लाख रू पयांपर्यंतची वार्षिक ५० लाखांची कामे दिली जाणार आहेत. ही कामे मुदतीत पूर्ण केल्यास दुसऱ्या वर्षी १५ लाखापर्यंतची वार्षिक पाच कामे दिली जाणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या अभियंत्यांना नोंदणी अर्जासह त्यांना देण्यात येणाऱ्या कामांचे स्वरूपाविषयी अवगत करू न माहितीपत्रक उपलब्ध करू न दिले जात आहे.

Web Title: Meet for the unemployed electrical engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.