शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशाचा दशरथ मांझी, एकट्याने खोदला 3 किमी लांब कालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 15:50 IST

दशरथ मांझी यांना 100 मी लांबीचा रस्ता खोदण्यासाठी 22 वर्षे लागली होती. मात्र नायक यांनी 3 किमीचा कालवा खणण्याचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण केले आहे.

भूवनेश्वर- डोंगरामध्ये केवळ छिन्नी, हातोडीच्या साहाय्याने खोदून रस्ता काढणाऱ्या दशरथ मांझीचे उदाहरण तुम्ही ऐकले असेलच. दशरथ मांझी यांना 100 मी लांबीचा रस्ता खोदण्यासाठी 22 वर्षे लागली होती. असाच एक मांझी ओडिशामध्येसुद्धा आहे. या आदिवासी समुदायातील व्यक्तीने 3 किमी लांबीचा कालवाच खणून काढला आहे. ओडिशातील केओंझार जिल्ह्यात राहाणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे. दैतारी नायक. त्यांचं वय 75 वर्षे आहे. ओडिशातील गोनासिका पर्वतामधून तीन किमीचा कालवा काढून त्यांनी आपल्या 100 एकर शेतजमिनीसाठी पाण्याची सोय केली आहे. त्यांचे शेत तलवैतरणी नावाच्या खेडेगावात आहे.

 नायक यांनी 3 किमीचा कालवा खणण्याचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण केले आहे. या कामासाठी त्यांना त्यांचे भाऊ आणि गावकऱ्यांची मदत झाली होती. आता या कालव्यातील पाण्याने तांदूळ, मोहरी, मका अशी पिके घेत आहेत. केओंझारचे जिल्हाधिकारी आशिष ठाकरे यांनी दैतारी नायक यांच्या दृढनिश्चयाचं व कष्टांचं कौतुक केले आहे.याच वर्षी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचं कर्तृत्त्व असंच समोर आलं होतं. जालंधर नायक नावाच्या व्यक्तीने त्यांचे गाव गुम्साही आणि फुलबनी यांना जोडणारा रस्ता तयार करण्यासाठी पहाड खोदून काढला. 45 वर्षांच्या या व्यक्तीन सलग दोन वर्षे रोज 8 तास काम करुन हा रस्ता तयार केला. आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होत होता म्हणून केवळ छिन्नी, हातोडीच्या साहाय्याने या माणसाने रस्ता खोदून काढला.

टॅग्स :Odishaओदिशाriverनदी