मेरठमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: January 3, 2015 09:47 IST2015-01-03T09:47:41+5:302015-01-03T09:47:50+5:30
बंदुकीचा धाक दाखवून २२ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली आहे.

मेरठमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ३ - बंदुकीचा धाक दाखवून २२ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील दौराला भागात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी चार जणांनी महिलेला बंदूकीचा धाक दाखवत तिचे अपहरण केले आणि जवळच्याच एका घरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारू अशी धमकी देऊन त्या आरोपींनी तिला दुस-या दिवशी तिच्या घराजवळ सोडले. सदर प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र शुक्रवारी तिच्या घरच्यांना या घटनेबद्दल कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान हे चारही आरोपी पीडित महिलेच्या गावातीलच असून अमित, विकास, बलकर आणि अंकित अशी त्यांची नावे असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.