शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेरठमध्ये भाजपा आमदार संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार, हँड ग्रेनेडनं हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 09:02 IST

भाजपा आमदार संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा हल्ला करण्यात आला आहे.

मेरठ- भाजपा आमदार संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात बंदुकधा-यानं संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार करत जाता जाता हँड ग्रेनेडनं हल्ला केला. बुधवारी मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली आहे. हल्ला झाला तेव्हा आमदार संगीत सोम हे स्वतःच्या घरीच झोपलेले होते.विशेष म्हणजे हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या घराच्या गेटवर गार्ड तैनात होते. गार्डच्या माहितीनुसार, एक स्विफ्ट कार गेटवर थांबली, काळे कपडे घातलेला एक शस्त्रास्त्रधारी गाडीतून उतरला आणि त्यानं गोळीबाराला सुरुवात केली. गार्ड त्याच्यावर धावून गेल्यानंतर त्यानं ग्रेनेड फेकून पळ काढला. ग्रेनेड घराबाहेरील एका कारच्या खाली पडला. परंतु सुदैवानं ग्रेनेडचा स्फोट झाला नाही.मेरठच्या एसएसपी यांनी सांगितलं की, रात्री 12.45 वाजता हल्ला झाल्याची सुरक्षारक्षकानं माहिती दिली आहे. आम्हाला घटनास्थळावरून गोळ्यांचे बॉक्स मिळाले. फॉरेन्सिक टीम याचा तपास करत आहे. घटनास्थळी एक हँड ग्रेनेडही मिळालं. तो फुटलेला नव्हता. हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. गार्डची केबिन आणि मुख्य गेटला निशाण्यावर ठेवून गोळीबार करण्यात आला. आम्ही सीसीटीव्ही फुटेजचा तपास करतोय. दुसरीकडे संगीत सोम म्हणाले, मला कोणतीही धमकी मिळालेली नाही. परंतु हा दोन वर्षांपूर्वी एक फोन आला होता. ज्यात ग्रेनेडनं मारण्याची धमकी देण्यात आली होती. सध्या तरी घटनास्थळ पोलीस दाखल झाले असून, तपास करत आहेत. भाजपा आमदाराच्या घरावर झालेल्या हल्ल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमदार संगीत सोम हे 2013च्या मुजफ्फरनगर दंगलीदरम्यानही चर्चेत आले होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश