शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा माझ्याविरोधात षडयंत्र रचतेय, माझी हत्या करू पाहतेय"; राकेश टिकैत यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 15:06 IST

Rakesh Tikait And BJP : कर्नाटकात माझ्यावर हल्ला झाला, मी हात पुढे केला. जर मी हात पुढे केला नसता तर हल्लेखोराने माझ्या डोक्यात वार केला असता असं टिकैत यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं विधान केलं आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राकेश टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले की, भाजपा माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे आणि माझी हत्या करू पाहत आहेत. भाजपाचे नेतृत्व अशा कृत्यांमध्ये गुंतले आहे, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. कर्नाटकात हल्ल्याचा कट रचला गेला, ज्यात माझा जीव जाऊ शकला असता असंही सांगितलं. याच दरम्यान राकेश टिकैत यांनी बंगळुरू येथील शाई प्रकरणावरही भाष्य केलं आहे. माझ्यासोबत जे घडलं ते भाजपाचे षडयंत्र आहे असं म्हटलं. 

भाजपा सरकारला माझी हत्या करायची आहे, असेही ते म्हणाले. कर्नाटकात माझ्यावर हल्ला झाला, मी हात पुढे केला. जर मी हात पुढे केला नसता तर हल्लेखोराने माझ्या डोक्यात वार केला असता असं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कायदा आपलं काम करेल. भारतीय किसान युनियन (BKU) चे नेते आणि शेतकरी आंदोलनाचा मोठा चेहरा राकेश टिकैत यांच्यावर काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये हल्ला झाला होता. एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर शाई फेकली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पत्रकार परिषद सुरू असतानाच तेथे उपस्थित लोकांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी एका व्यक्तीने शेतकरी नेत्यांवर शाई फेकली. यानंतर तिथे उपस्थित लोकांमध्ये तुफान हाणामारी आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. पत्रकार परिषद सभागृहात गोंधळ घालणाऱ्या आणि राकेश टिकैत यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या काही जणांना तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले होते.  एका स्थानिक वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओवरून दोन्ही शेतकरी नेते स्पष्टीकरण देण्यासाठी आले होते.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपाPoliticsराजकारण