शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

भारत पाठविणार वैद्यकीय मदत; नागरिकांना मायदेशी आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 03:54 IST

ते म्हणाले की, भारतातून वुहानला वैद्यकीय मदत घेऊन जाणाऱ्या विमानात

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरलेली अत्यंत जीवघेणी साथ आटोक्यात आणण्यासाठी भारतचीनमधील वुहान शहरात या आठवड्याच्या अखेरीस एका विशेष विमानाने वैद्यकीय मदत पाठविणार आहे. वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय, तसेच शेजारी देशांतील नागरिकांपैकी काही जणांना या विमानातून भारतात आणले जाईल, असे चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भारतातून वुहानला वैद्यकीय मदत घेऊन जाणाऱ्या विमानात मर्यादित आसनक्षमता आहे. त्यामुळे तिथून काही जणांनाच परत आणणे शक्य होणार आहे. चीनमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सध्या मास्क, ग्लोव्हज, सुटस् यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. चीनमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व उत्पादन कमी असल्याने तिथे या गोष्टीचा तुटवडा निर्माण झाला आहे. चीनमधील हुबेई प्रांत व त्याची राजधानी वुहान शहरातून सर्वप्रथम कोरोना विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली.त्यानंतर ही साथ जगभरात अनेक देशांत पसरली आहे. चीनमध्ये हुबेईसह ३१ प्रांतांमध्ये कोरोनाची साथ पसरली असली तरी तिचा सर्वात जास्त जोर वुहान शहर व परिसरातच आहे. वुहान शहरात अडकलेल्या ४०० हून अधिक भारतीयांना काही दिवसांपूर्वी तिथून विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आले. त्यांच्यापैकी एकालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले.१२ औषधांच्या निर्यातीवर बंधने येणारच्चीनमधील हुबेई प्रांतात कोरोना विषाणूच्या साथीने हाहाकार माजविला असताना, त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सावधगिरीचा उपाय म्हणून १२ अत्यावश्यक औषधांच्या निर्यातीवर काही बंधने लादण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.च्यात अँटिबायोटिक, व्हिटॅमिन, हॉर्मोन्स या प्रकारातील औषधांचा समावेश आहे. औषधांच्या निर्मितीमध्ये लागणाºया घटकांचा पुरवठा चीनच्या वुहान प्रांतातून भारतामध्ये होतो. तिथे कोरोनाच्या साथीमुळे सर्व उद्योगधंदे सध्या बंद आहेत. त्याचा भारतातील औषधनिर्मिती व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयchinaचीनIndiaभारत