टीव्हीवरील अश्लीलता थांबविण्यासाठी यंत्रणा
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:23+5:302015-02-20T01:10:23+5:30
हायकोर्टात माहिती : याचिकेवर मार्चमध्ये सुनावणी

टीव्हीवरील अश्लीलता थांबविण्यासाठी यंत्रणा
ह यकोर्टात माहिती : याचिकेवर मार्चमध्ये सुनावणीनागपूर : टीव्ही वाहिन्यांवर अश्लील कार्यक्रम व जाहिराती प्रसारित होऊ नयेत यासाठी यंत्रणा तयार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती केंद्र शासनातर्फे हायकोर्टात देण्यात आली आहे. संबंधित जनहित याचिकेवर ४ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ॲड. प्रवीण डहाट असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. टीव्ही वाहिन्यांवर अश्लील व द्विअर्थी भाषेचे कार्यक्रम सर्रास दाखविले जात आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सेंसर बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु, टीव्ही वाहिन्यांवरून चित्रपट, जाहिराती, मालिका इत्यादी कार्यक्रम प्रसारित करण्यापूर्वी त्यांची योग्यता तपासण्याची यंत्रणा नाही. टीव्ही हे घरोघरी पोहोचलेले माध्यम आहे. यामुळे टीव्हीची संवेदनशीलता इतर माध्यमांपेक्षा जास्त आहे. केबल टीव्ही नेटवर्क नियमानुसार अश्लील चित्रपट, जाहिराती व मालिका टीव्हीवर प्रसारित करता येत नाही. त्यासाठी वेळोवेळी विविध दिशानिर्देश देण्यात आले आहेत. त्याचे कोणीच पालन करीत नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. एम. अनिलकुमार यांनी बाजू मांडली.