शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Mecca Masjid Case : 'NIA आंधळी व बहिरीदेखील', मक्का मशिदीतील आरोपींच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 11:19 IST

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी NIA वर बोचरी टीका केली आहे.

नवी दिल्ली - हैदराबादमधील मक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात 11 वर्षानंतर न्यायालयानं निकाल दिला. या स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या स्वामी असीमानंद आणि इतर पाच जणांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींची सुटका करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयानं दिले. दरम्यान, एनआयएच्या निकालावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली. ''लोकं एनआयएला पिंजऱ्यातील पोपट म्हणतात, पण मी म्हणजे एनआयए आंधळी आणि बहिरीदेखील आहे'', अशी टीका त्यांनी ओवेसी यांनी भाषणादरम्यान केली आहे. शिवाय, मक्का मस्जिद बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबांपैकी कोणी निकालाविरोधात दाद मागणार असेल तर त्यांना कायदेशीर मदत करण्यास तयार असल्याचेही यावेळी ओवेसी यांनी सांगितले.

स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका

मक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद आणि इतर पाच जणांची सुटका करण्यात आली आहे. सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं प्रकरणातील सर्व आरोपींची सुटका केली. स्वामी असीमानंद हे या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होते. 11 मे 2007 रोजी मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. यानंतर आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 10 पैकी 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद उर्फ नबा कुमार सरकार, भारत मोहनलाल रत्नेश्वर उर्फ भारत भाई आणि राजेंद्र चौधरी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. या सर्वांना मक्का मशीद स्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाBlastस्फोट