अर्थ...तंत्राचा काटेकोर मंत्र!

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

गेल्या आठवड्यात जिल्‘ातील सहकारी साखर कारखानदारीसाठी एक अभिमानाचा क्षण आला. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वात वाटचाल करणारा कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी तर यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटकडून गौरविला गेला. सध्या सहकार बिकट स्थितीतून वाटचाल करत आहे. सहकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ झाला आहे. अशावेळी सहकाराला हिंमत देणारे हे पुरस्कार महत्वाचे ठरतात. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा पुरस्कार म्हणजे साखर कारखानदारीसाठी ऑस्करच! आजवर संजीवनीने इन्स्टीट्यूटचे सहा पुरस्कार पटकावले तर मुळाने हॅट्ट्रीक साधली आहे. अवघड परिस्थिती आणि आव्हाने असताना नगर जिल्‘ातील सहकार खंबीर पावले टाकत वाटच

Meaning ... Tactical Mantra of the technique! | अर्थ...तंत्राचा काटेकोर मंत्र!

अर्थ...तंत्राचा काटेकोर मंत्र!

ल्या आठवड्यात जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी एक अभिमानाचा क्षण आला. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वात वाटचाल करणारा कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी तर यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटकडून गौरविला गेला. सध्या सहकार बिकट स्थितीतून वाटचाल करत आहे. सहकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ झाला आहे. अशावेळी सहकाराला हिंमत देणारे हे पुरस्कार महत्वाचे ठरतात. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा पुरस्कार म्हणजे साखर कारखानदारीसाठी ऑस्करच! आजवर संजीवनीने इन्स्टीट्यूटचे सहा पुरस्कार पटकावले तर मुळाने हॅट्ट्रीक साधली आहे. अवघड परिस्थिती आणि आव्हाने असताना नगर जिल्ह्यातील सहकार खंबीर पावले टाकत वाटचाल करत आहे. ही दोन्ही उदाहरणे प्रातिनिधीक असली तरी अन्य काही कारखानेही उत्तम कामगिरी बजावत आहेत. काही कारखाने राजकारण आणि व्यवस्थापनातील चुकांची फळे भोगताहेत, पण त्यांनाही उभारीची आस आहेच! शेवटी प्रश्न शेतकर्‍यांच्या उन्नतीचा आहे. त्यामुळे संजीवनी आणि मुळाच्या पुरस्कारातून चांगला संदेश नक्कीच घेता येईल. नवे तंत्र अवगत केले आणि अर्थाचे नियोजन काटेकोर झाले तर प्रगतीची वाट चुकणार नाही, एवढा धडा यातून घेतला तरी नगर जिल्ह्यातील सहकार राज्यासाठी मार्गदर्शक ठरत राहील.

Web Title: Meaning ... Tactical Mantra of the technique!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.