शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

#MeToo: केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ; चार महिलांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 18:19 IST

काँग्रेसकडून अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली: लैंगिक शोषणामुळे अमेरिकेत सुरू झालेलं #MeToo वादळ आता भारतात पोहोचलं आहे. बॉलीवूडनंतर या वादळानं राजकारणही ढवळून काढलं आहे. याचा पहिला धक्का मोदी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या एम. जे. अकबर यांना बसला आहे. अकबर यांच्यावर चार महिलांनी सनसनाटी आरोप केले आहेत. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार गजला वहाब यांनी एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 1994 मध्ये 'द एशियन एज'मध्ये असताना अकबर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप गजला यांनी केला आहे. 'अकबर यांचं लिखाण मला आवडायचं. त्यामुळे मला पत्रकार व्हायचं होतं. मला त्यांच्याकडून पत्रकारिता शिकायची होती,' असं गजला यांनी म्हटलं आहे. अकबर यांच्याबद्दल मनात असलेल्या प्रतिमेला 1997 मध्ये तडा गेला. त्यांनी जवळपास 6 महिने माझ्याशी अश्लिल कृत्यं केली. विशेष म्हणजे हे सर्व त्यांच्या केबिनमध्ये घडलं, अशी व्यथा गजला यांनी मांडली आहे. सध्या सोशल मीडियावर #MeToo मोहिमेनं जोर धरला आहे. त्यामुळे गजला वहाब यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली. आपण अत्याचारांची वाच्यता केल्यामुळे इतरही महिला अकबर यांच्याविरोधात मोकळेपणानं बोलतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर तीन महिल्यांनी अकबर यांच्यावर गंभीर आरोप केले. यामध्ये वरिष्ठ पत्रकार प्रिया रमानी, शूमा राहा आणि लेखिका प्रेरणा सिंह बिंद्रा यांचा समावेश आहे. याविषयी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी या प्रश्नांना बगल दिली. यावरुन काँग्रेसनं अकबर यांच्यावर निशाणा साधला आहे. अकबर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी केली आहे.  

टॅग्स :Metoo CampaignमीटूBJPभाजपाsex crimeसेक्स गुन्हाsexual harassmentलैंगिक छळ