एमडीएमके रालोआतून बाहेर
By Admin | Updated: December 9, 2014 01:54 IST2014-12-09T01:54:20+5:302014-12-09T01:54:20+5:30
केंद्रातील भाजपा सरकार तामिळींच्या विरोधात काम करीत आहे आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे,

एमडीएमके रालोआतून बाहेर
चेन्नई : केंद्रातील भाजपा सरकार तामिळींच्या विरोधात काम करीत आहे आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप करीत वायको यांच्या नेतृत्वाखालील एमडीएमकेने तामिळनाडूतील रालोआशी काडीमोड घेतला. जिल्हा सचिवांच्या बैठकीत रालोआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. लोकसभा निवडणुकीआधी एमडीएमके रालोआत सामील झाला होता.