Bobby Kinnar MCD Result: माजी नगरसेवकाचं तिकीट कापून ट्रान्सजेंडरला दिली होती उमेदवारी, पाहा काय लागला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:23 PM2022-12-07T13:23:36+5:302022-12-07T13:25:22+5:30

'आप'ने माजी नगरसेवक संजय यांच्या जागी बॉबीला दिली होती उमेदवारी

MCD Election Results Transgender candidate bobby kinnar from sultanpuri a ward see result latest update aap won | Bobby Kinnar MCD Result: माजी नगरसेवकाचं तिकीट कापून ट्रान्सजेंडरला दिली होती उमेदवारी, पाहा काय लागला निकाल

Bobby Kinnar MCD Result: माजी नगरसेवकाचं तिकीट कापून ट्रान्सजेंडरला दिली होती उमेदवारी, पाहा काय लागला निकाल

Next

Bobby Kinnar MCD Election Result: नवी दिल्लीत महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाने मुसंडी मारली आहे. सुरुवातीपासूनच 'आप'चे उमेदवार विजयाच्या दिशेने मोठ्या संख्येने आगेकूच करत आहेत. त्यामुळे, दिल्लीतीलआप समर्थकांनाही विजयाचा विश्वास आहे. दिल्लीत सकाळपासूनच आपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या संपूर्ण निकालापूर्वी जल्लोष सुरू केला आहे. सुरूवातीचे कल भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव दर्शवत आहेत. या दरम्यान, सर्वात जास्त चर्चा आहे ती सुल्तानपुरी-ए जागेच्या निवडणुकीची. आप ने ट्रान्सजेंडर उमेदवार बॉबी किन्नरला तेथून तिकीट दिले होते, त्या जागेचा निकाल काय आला जाणून घेऊया

सुलतानपुरी-ए मधून बॉबी किन्नरला उमेदवारी

सुलतानपूर माजरा विधानसभेच्या सुलतानपुरी-ए प्रभागातून आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार बॉबी किन्नरला उमेदवारी मिळाली होती. त्या जागेवर बॉबी किन्नरचा विजय झाला असून भारतीय जनता पक्षाची एकता जाटव यांचा पराभव झाला. माजी नगरसेवकाचे तिकीट कापून 'आप'ने बॉबीला तिकीट दिले होते.  आम आदमी पार्टीने (आप) सुलतानपुरी-ए प्रभाग निकालातून माजी नगरसेवक संजय यांचे तिकीट कापून ट्रान्सजेंडर बॉबी किन्नरला तिकीट दिले होते. यानंतर बॉबी प्रसिद्धीच्या झोतात आला आणि एखाद्या राजकीय पक्षाने ट्रान्सजेंडर समुदायातील उमेदवाराला तिकीट देण्याची ही दिल्लीतील पहिलीच वेळ होती. त्यात त्याने विजय मिळवला.

याशिवाय तेथील काँटे की टक्कर असलेल्या काँग्रेस उमेदवार वरुणा ढाका यांचा ६,७१४ मतांनी बॉबी किन्नरने पराभव केला. राज्य निवडणूक आयोगाने बॉबी किन्नर यांच्या विजयाला दुजोरा दिला आहे. बॉबी किन्नरने काँग्रेस उमेदवार वरुण ढाका यांचा पराभव केला. यापूर्वी बॉबीने सांगितले होते की मतदारसंघ सुशोभित करायचा आहे आणि जनजीवन सुधारायचे आहे. दिल्ली महानगरपालिकेतून (एमसीडी) भ्रष्टाचार दूर करण्यासाठी काम करणार असल्याचे बॉबीने म्हटले होते.

बॉबीने २०१७ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती!

बॉबी किन्नर राजकारणात पूर्वीपासून सक्रिय असून अण्णांच्या आंदोलनाच्या काळापासून सक्रिय आहे. 2017 मध्ये झालेल्या दिल्ली महानगरपालिका (MCD निवडणूक) मध्ये तिने निवडणूक लढवली आणि नंतर तिने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

 

Web Title: MCD Election Results Transgender candidate bobby kinnar from sultanpuri a ward see result latest update aap won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.