सीबीआयकडून मायावतींची कसून चौकशी

By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:37+5:302015-10-03T00:20:37+5:30

नवी दिल्ली: कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन(एनआरएमएच) घोटाळ्याबाबत सीबीआयने सोमवारी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची दोन तास कसून चौकशी केली. मायावतींविरुद्ध नवे पुरावे आढळल्याचा दावा केल्यानंतर सीबीआयने त्यांना पाचारण केले होते.

Mayawati's thorough investigation against the CBI | सीबीआयकडून मायावतींची कसून चौकशी

सीबीआयकडून मायावतींची कसून चौकशी

ी दिल्ली: कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन(एनआरएमएच) घोटाळ्याबाबत सीबीआयने सोमवारी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची दोन तास कसून चौकशी केली. मायावतींविरुद्ध नवे पुरावे आढळल्याचा दावा केल्यानंतर सीबीआयने त्यांना पाचारण केले होते.
या घोटाळ्याबाबत सीबीआयने ७४ एफआयआर नोंदवत एकूण ४८ आरोपपत्र दाखल केले आहेत. मायावतींनी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतील काही निर्णयांबाबत त्या बोलल्या नाहीत. मायावतींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विभाजन करीत जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांची १०० पदे भरताना घोटाळा घडवून आणल्याचा आरोप आहे. मायावतींच्या चौकशीबाबत बसपाने अधिकृतरीत्या प्रतिक्रिया टाळली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ मिळविण्यासाठी केंद्र सरकार सीबीआयचा गैरवापर करीत असल्याचा आरोप मायावती यांनी अलीकडेच केला होता.(वृत्तसंस्था)

Web Title: Mayawati's thorough investigation against the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.