शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"जाहीर सभांमध्ये जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहतोय," मायावतींचा विरोधी पक्षांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 14:28 IST

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत.

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या (Uttar Pradesh Election) पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. परंतु चार वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या आणि बसपाच्या सुप्रिमो मायावती (Former CM Mayawati) मात्र सध्या मैदानात उतरलेल्या दिसत नाहीत. मायावरती इतर नेत्यांप्रमाणे अद्यापही रॅली का करत नाहीत, असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, मायावती यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना भाजपवर निशाणा साझला आहे. तसंच त्यांच्यावर होत असलेल्या टीकांवरही त्यांनी उत्तर दिलं आहे.

"सध्या निवडणुकांपूर्वी ज्या जाहीर सभा घेतल्या जात आहे, त्या जनतेच्या पैशांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्या जोरावर घेतल्या जात आहेत," असं मायावती म्हणाल्या. मायावती यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला. "सत्तेतील लोकं सध्या जे काही करत आहेत ते सरकार आणि गरीबांच्या खजान्यातून करत आहेत. आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष आहे. दुसऱ्या पक्षांप्रमाणे धनदांडग्यांच्या हा पक्ष नाही," असंही त्या म्हणाल्या.

धनदांडग्यांचा पक्ष नाही"माझे लोक जाहीर सभा आणि रॅलींचा अधिक आर्थिक बोजा उचलू शकणार नाही. आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष आहे. दुसऱ्या पक्षांप्रमाणे धनदांडग्यांचा हा पक्ष नाही. आमचा पक्ष एक चळवळही आहे. जर आम्ही दुसऱ्यांचं अनुकरण केलं तर पैशांच्या अभावामुळे आम्हाला निवडणुकांमध्ये मोठं नुकसानही सोसावं लागेल. निवडणुकांच्या तयारीबाबत आमची निराळी कार्यशैली आहे," असंही त्या म्हणाल्या.

'सामान्य जनतेचा पैसा'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या रॅलीदरम्यान मायावती यांच्यावर निशाणा साधला होता. "निवडणुका आल्या तरी त्या प्रचारासाठी बाहेर पडल्या नाहीत. त्या पहिल्यापासूनच पराभवाला घाबल्या आहेत, असं वाटतंय. उत्तर प्रदेशात सपा-बसपा विकास करू शकत नाहीत," असं ते म्हणाले. यावर मायावती यांनी प्रत्युत्तर दिलं.

"जेव्हा भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांचं केंद्रात किंवा ज्या राज्यांमध्ये सरकार असतं त्यावेळी निवडणुका जाहीर होण्याच्या जवळपास दोन अडीच महिन्यांपूर्वीच मोठ्या घोषणा, उद्घाटनं, लोकार्पण असे कार्यक्रम करतात. याच्याच आडून सरकारी खर्चानं मोठ्या जाहीर सभाही घेतल्या जातात. यावर पक्षाचा नाही, तर सामान्य जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो," असंही ते म्हणाले.

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेश