शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:36 IST

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर (FIR Against rhea chakraborty) गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती या संपूर्ण प्रकरणाची सीबाआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मायावती ट्विट करत म्हणाल्या की, मूळचा बिहारचा तरुण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनंतर या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलंय. आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र किंवा बिहार पोलिसांकडून होण्याऐवजी सीबाआयद्वारे होणं योग्य आहे' असं मायावतींनी सांगितले आहे.

तसेच सुशांत राजपूत प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहारच्या काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे असं दिसतंय की त्यांचा खरा हेतून या प्रकरणाच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा आहे, अशी टीका देखील मायवती यांनी काँग्रेसवर केली आहे. त्याचप्रमाणे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने गंभीरता दाखवावी, असं देखील मायवती यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी, गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला. यावेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं,  अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली. त्यामुळे आता अंकिताच्या या जबाबानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंगPoliceपोलिसmayawatiमायावतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार